नवी दिल्ली: भारतीय संघातील खेळाडूंच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे त्यातील आघाडीचे नाव होय. विद्यमान भारतीय संघात रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीसारखे फलंदाज आहेत ज्यांच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. असाच एका भारतीय फलंदाजाच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊयात ज्याने अनोखा विक्रम केला आहे.

वाचा-
भारतीय संघातील माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिन तेंडुलकरनंतर वनडेत द्विशतक करणारा तो दुसरा फलंदाज होता. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेळा त्रिशतक करणारा ते एकमेव भारतीय आहे. सेहवाग जेव्हा फॉर्ममध्ये येतो तेव्हा गोलंदाजांची खैर नसते.

वाचा-
भारताच्या या माजी क्रिकेटपटूच्या नावावर असाच विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा मारण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. सेहवागच्या फलंदाजीची स्टाइलच अशी होती की तो पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करायचा. यामुळेच पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा चौकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सेहवागने संपूर्ण करिअरमध्ये ५४ वेळा अशी कामगिरी केली. यात कसोटी, वनडे आणि टी-२० क्रिकेटचा समावेश आहे.

वाचा-
सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये २५ वेळा पहिल्या चेंडूवर चौकार मारला. वनडे क्रिकेटमध्ये २६ वेळा तर टी-२० क्रिकेटमध्ये ३ वेळा अशी कामगिरी केली. त्याने भारताकडून १०४ कसोटी सामन्यात २३ शतकांसह ८ हजार ५८६ धावा केल्या. यात ३१९ ही त्याची सर्वोच्च धाव संख्या आहे. तर २५१ वनडेत ८ हजार २७३ धावा केल्या. वनडेत २१९ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. टी-२०त १९ सामन्यात त्याने ३९४ धावा केल्या.

पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा चौकार मारणारा सेहवाग
कसोटी- २५
वनडे-२६
टी २०- ३

लॉकडाऊनच्या काळात आणि त्याचे कुटुंबीयांनी गावी परतणाऱ्या प्रवासी मजूरांसाठी जेवण तयार करून दिले होते. या कामात सेहवागची आई, पत्नी आणि दोन मुले मदत करत होती. याचे फोटो सेहवागने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसेच ‘घर से सेवा’ नावाचे अभियान सुरू केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here