नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे अन्य खेळाप्रमाणे क्रिकेटमधील सामने स्थगित करण्यात आले होते. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना क्रिकेट सामने आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला दौरा वेस्ट इंडिजचा असून ते इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही संघ ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. पण या दौऱ्याआधीच वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी इंग्लंडला जाण्यास नकार दिला आहे. या सर्वांन एकच कारण दिले आहे ते म्हणजे करोना…

वाचा-
ज्या खेळाडूंनी दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे त्यात डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि यांचा समावेश आहे. आता या जागी नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात इएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना जॉनी ग्रेव्ह म्हणाले, क्रिकेट बोर्डाने याआधीच ठरवले आहे की इंग्लंड दौऱ्यावर त्याच खेळाडूंना पाठवले जाईल ज्यांना प्रवास करण्यात सुरक्षितता वाटते. ज्यांना शंका आहे त्यांना पाठवले जाणार नाही. तसे झाले तर कामगिरीवर त्याचा परिणाम होईल.

वाचा-
आम्ही खेळाडूंची भीती समजू शकतो. यासंदर्भात ब्रव्होसोबत गेल्या शुक्रवारी चर्चा झाली आणि अन्य दोन खेळाडूंनी मेलवरून दौऱ्यावर येणार नसल्याचे सांगितले. किमो पॉलने मेलमध्ये उल्लेख केला की, इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय माझ्यासाठी कठिण होता. संपूर्ण कुटुंबात मी एकटा व्यक्ती आहे जो पैसे कमावतो. जर मला काही झाले तर घरातील लोकांना कोण पाहणार, त्याचे कसे होईल, याची काळजी आहे.

वाचा-
वेस्ट इंडिज बोर्डाने या तिनही खेळाडूंचा निर्णय स्विकारला आहे आणि त्याचा सन्मान केला आहे. आगामी दौऱ्यात संघाची निवड करताना या दौऱ्यातून माघार घेतल्याची गोष्टी विचारत घेतली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.

असा आहे दौरा-
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना ८-१२ जुलै या कालावधीमध्ये एजेस बाऊल येथे होणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना १६ ते २० जुलै या कालावधीमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना २४-२८ जुलै या कालावधीत याच ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी जाणारा वेस्ट इंडिजचा संघजेसन होल्डन (कर्णधार), जेरमिन ब्लॅकवूड, एन. बोनर, क्रेग ब्रेथवेट, एस. ब्रूक्स, जॅन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रहकिम डॉवरीच, शाई होप, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, कोमार रोच आणि रायमन रेइफर.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here