जातीवाचक टिप्पणी केल्यानंतर भाराताचा क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली होती. त्याचबरोबर त्याला अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. अटक होण्याच्या भितीनंतर युवराजने एक काम केले असून त्याने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर युवराज सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवराज सिंग लाइव्ह चॅटमध्ये रोहित शर्माशी बोलत आहेत. त्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या संदर्भात बोलताना गंमतीने एक कमेंट केली. युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याने सोशल मीडियावर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. यामुळे आता युवराजच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता युवराजला अटक होणार की तो यापूर्वी जामीन मिळवणार, हे पाहावे लागणार आहे. पण हे प्रकरण युवराजला चांगलेच भोवल्याचे पाहायला मिळत आहे.

युवराजने आता एक ट्विटरवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आपण जर कोणाला दुखावले असेल तर त्याची सपशेल माफी मागत असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये युवराजने सांगितले की, ” रंग, धर्म, पंथ किंवा लिंग यामध्ये आतापर्यंत मी कोणताच भेदभाव केलेला नाही. लोकांसाठी मी आतापर्यंत झटत आलो आहे. त्यामुळे कोणत्याही असमानतेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो.”

सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल असलेल्या रजत कलसन यांनी हरियाणातील हांसी येथील पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. कलसन हे दलित अधिकाराचे कार्यकर्ते आहेत. कलसन यांनी युवराजविरोधात तक्रार दाखल करत, जातीय तेढ वाढवल्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळ आता युवराजला खरं अटक होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष होते. पण त्यापूर्वीच आता युवराजने आपली बाजू मांडली आहे.

रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल गंमतीने जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता. आता यावरून सोशल मीडीयावर युवराजने माफी मागावी अशी मागणी केली जात होती. चॅटमध्ये युवराज आणि रोहित दोघे फिरकीपटू चहलच्या टिकटॉक व्हिडिओवर बोलत होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here