सध्याच्या घडीला एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवासांमध्ये एक क्रीडा स्पर्धा सुरु करण्यात आली होती. या स्पर्धेतील एकाच संघातील तब्बल २५ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. या खळबळजनक बातमीने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

करोनाचा प्रसार काही केल्या थांबताना दिसत नाही. सध्याच्या काळात प्रेक्षकांविना सामने खेळवायला काही देशांनी परवानगी दिली आहे. स्पर्धांसाठी प्रेक्षकांना स्टेडियमध्ये प्रवेश देण्यात येत नसला तरी आता संघातील खेळाडूंनाच करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

वाचा-

करोनामुळे २ महिने क्रीडा स्पर्धा स्थ़गित करण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात एक फुटबॉल लीग सुरु करण्यात आली होती. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ही स्पर्धा चांगलीच गाजली. पण एका आठवड्याने या स्पर्धेतील एका संघाने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

गेल्या आठवड्या युक्रेनमध्ये फुटबॉल लीग सुरु करण्यात आली होती. एका आठवड्यानंतर ६५ जणांची करोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये एकाच संघातील २५ खेळाडू आणि स्टाफ करोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. आता या २५ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

वाचा-

याबाबत युक्रेन महासंघाने सांगितले की, ” आम्ही ६५ जणांची करोना चाचणी केली होती. या संघाचा पहिला सामना काही कारणास्तव रदद् करण्यात आला होता. पण आता यापुढील दोन सामने स्थगित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.”
वाचा-

करोनामुळे क्रीडा विश्व ठप्प पडलेले होते. २-३ महिने क्रीडा विश्वात एकही मोठी स्पर्धा झाली नव्हती. त्यामुळे आता कुठेतरी स्पर्धा सुरु कराव्यात जेणेकरून खेळ आणि संघटना यांच्यावरील ताण कमी होऊ शकेल, हा विचार करण्यात आला होता. पण स्पर्धा सुरु झाल्यावर काही दिवसांमध्येच ही वाईट बातमी कानावर पडली आहे.

(ही बातमी अमर उजाला या संकेतस्थळाने दिली आहे. या बातमीची कोणताही जबाबदारी महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम घेत नाही.)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here