भारतामध्ये करोनाचा प्रसार वाढत चालला आहे. जगातील करोना बाधितांच्या संख्येमध्ये भारत आता सहाव्या स्थानावर आला आहे. भारतामध्ये सर्वाधिक करोना बाधितांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनााने मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही भारतामध्ये सर्वात जास्त आहे.
महाराष्ट्राचे माजी फुटबॉलपटू इलाईदाथ हम्साव्कोया यांचे करोनामुळे निधन झाले आहे. करोना झाल्यावर त्यांना श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळेच त्यांना बंगळुरु येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचा करोनाविरोधातील लढा अखेर अपयशी ठरला, ते ६३ वर्षांचे होते.
या माजी फुटबॉपटूंना सुरुवातीला निमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्लाझ्मा थेरिपी सुरु केली होती. पण या थेरिपीनंतरही डॉक्टरांना या माजी फुटबॉलपटूला वाचवण्यात अपयश आले आहे.
इलाईदाथ यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. संतोष ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेत ते महाराष्ट्राकडून खेळले होते. त्याचबरोबर मोहन बगान आणि मोहम्मदीन स्पोर्टींग क्लबकडूनही ते खेळले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times