एका आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूवर लॉकडाऊनमुळे फार वाईट वेळ आली होती. तब्बल ७२ दिवस हा फुबॉलपटू मुंबई विमानतळावर अडकून पडला होता. अखेर ही गोष्ट महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना समजली. ही बातमी समजताच आदित्य त्वरीत या फुटबॉलपटूच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

भारतातील एका स्पर्धेसाठी चक्क घाना येथून २३ वर्षीय फुटबॉलपटू रँडी जुआन म्युलर नोव्हेंबर महिन्यात आला होता. केरळमधील ओआरपीसी क्लबमध्ये फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी तो आला होता. एका सामन्यासाठी त्याला २-३ हजार रुपये मिळत होते. पण त्याला जास्त सामने खेळायला मिळाले नाहीत. लॉकडाऊनमुळे भारतात सर्व स्पर्धा बंद करण्यात आल्या होत्या.

वाचा-

या स्पर्धेत खेळण्यासाठी म्युलरने जवळपास दीड लाख रुपये खर्च केले होते. या स्पर्धेतून म्युलरला जास्त काही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्याने आपल्या घरी घानाला फोन केला आणि पैसे मागवून घेतले. त्यानंतर त्याने घानाला जाण्यासाठी विमानाचे तिकिट बुक केले आणि तो मुंबईला आला. पण जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा त्याला वेगळेच चित्र पाहायला मिळाले. लॉकडाऊनमुळे सर्व विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नेमके करायचे काय, हा प्रश्न त्याच्यापुढे होता. कारण गाठिशी जास्त पैसे नव्हतेच. त्यामुळे २१ मार्चपासून त्याने मुंबई विमानतळालाच आपले घर बनवले. तब्बल ७२ दिवस तो मुंबईच्या विमानतळावर रााहीला.

वाचा-

याबाबत विचारल्यावर म्युलर म्हणाला की, ” भारतातील लोकं फार प्रेमळ आहेत आणि त्यांच्याकडे माणूसकी आहे. येथील कर्मचारी मला समोसा खायला द्यायचे. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांनी मला काही पैसेही दिले. विमानतळावर माझे थांबणे त्यांना आवडले नव्हते, कारण सुरक्षेचा मुद्दा होता. पण त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. उलट जेव्हा थंड वातावरण झाले होते तेव्हा त्यांनीच मला ब्लँकेट दिले. ही सर्व चांगली लोकं आहेत. पण मी घानामध्ये कधी पोहोचणार, याची मला आस लागली आहे.”

वाचा-

म्युलरने आपल्या परिस्थितीबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट आदित्य ठाकरे यांच्या नजरेस पडले. त्यानंतर आदित्य यांनी युवा सेनेच्या राहुल कनान यांना याबाबत कळवे आणि म्युलरची सर्व व्यवस्था करण्यास सांगितली. त्यानुसार वांद्रे येथील लकी हॉटेलमध्ये म्युलरची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर म्युलरला कपडे आणि सर्व दैनंदिन वस्तू देण्यात आल्या आहेत.

वाचा-

कोणावर कधी कसे दिवस येतील हे सांगता येत नाही. कारण कोणत्या परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, हे तुम्ही सांगू शकत नाही. अशीच वेळ आली होती ती म्युलरवर. सध्या म्युलरची आदित्य यांनी चांगली व्यवस्था केली आहे. पण तरीही म्युलरचे डोळे आकाशाला लागलेले आहेत. विमान कधी उडणार आणि मी घरी कधी पोहोचणार, अशीच भावना त्याच्या मनात असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here