भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आज ३२ वर्षांचा झाला आहे. त्याला या वाढदिवसाला खेळाडूंनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. अजिंक्यच्या काही जुन्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला आहे. अजिंक्यला कोणी कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पाहूया…

भारताचा कर्णधार विराट कोहलीने अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अजिंक्य, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुला उत्तम जावो, या शुभेच्छा.”

अजिंक्यचा खास मित्र आणि त्याचा भारतीय संघातील सहकारी रोहित शर्मानेही अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित म्हणाला की, ” अजिंक्य वाढदिवसाच्या शुभेच्छा. कुटुंबियांबरोबर तुझा आजचा दिवस चांगला व्यतित होवो. माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत.”

भारताचा फिरकीपटू आर. अश्विननेही यावेळी अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अश्विन म्हणाला की, ” अजिंक्य, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू स्लीपमध्ये पकडलेल्या कॅचेस अजूनही माझ्या स्मरणात आहेत. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ ठरो.”

भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारानेही यावेळी अजिंक्यचे अभिष्टचिंतन केले आहे. पुजारा म्हणाला की, ” भावा, वाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छा. या वर्षी तुला भरपूर यश मिळो आणि बरेच आनंदाचे क्षण तुला अनुभवता येवोत.”

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शास्त्री यावेळी म्हणाले की, ” तुझ्या आयुष्यात अनंत आनंदाचे क्षण येवोत. या वर्षात तुला चांगले क्षण अनुभवायला मिळोत. अजिंक्य, वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

अजिंक्यला लहानपणापासूनन कराटेची आवड होती. अजिंक्यने वयाच्या १२ व्या वर्षीच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला होता. आता जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा अजिंक्य काही वेळा कराटेचा सरावही करतो. आयपीएलमध्ये एकाच षटकात सहा चौकार मारण्याचा विक्रम अजिंक्यने आपल्या नावावर केला आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना २०१२ साली हा पराक्रम केला होता. या सामन्यात अजिंक्यने १०३ धावांची दमदार खेळीही साकारली होती.

भारतीय संघ २०१५ साली श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील एका कसोटी सामन्यात अजिंक्यने तब्बल आठ झेल पकडले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक सोडल्यास आठ झेल पकडणाच्या विक्रम अजिंक्यने आपल्या नावावर केला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here