भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने तिसरे द्विशतक झळकावले तेव्हा त्याची पत्नी रितिका सचदेवला रडू कोसळलं होतं. रोहितच्या द्विशतकानंतर रितिका का रडत होती, ही गोष्ट त्यावेळी कोणाला समजली नव्हती. पण या गोष्टीचे सत्य पुढे आले आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर तीन द्विशतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. पण रोहितसाठी हे तिसरे द्विशतक न विसरणारे आहे. कारण जेव्हा रोहितने हे द्विशतक झळकावून पत्नीकडे पाहिले तेव्हा नेमके काय घडले हे त्याला माहिती नव्हते. पण या खेळीनंतर जेव्हा रोहित ड्रेसिंग रुममध्ये गेला तेव्हा त्याला ही गोष्ट समजली होती. पण रोहितने ही गोष्ट तेव्हा सांगितली नव्हती. पण या गोष्टीचा खुलासा आता रोहितने केला आहे.

ही गोष्ट कधी घडली होती…भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २०१७ साली मोहाली एकदिवसीय सामना झाला होता. या सामन्यात रोहितने तिसरे द्विशतक झळकावले होते.

नेमके काय घडले होते…या सामन्यात रोहित धडाकेबाज फलंदाजी करत होता. या खेळीमध्ये रोहित १९५ धावांवर असताना एक चोरटी धाव घेतली होती. त्यावेळी रोहितच्या पत्नीच्या काळजाचा ठोका चुकला होता. याबाबत रोहित म्हणाला की, ” या खेळीनंतर मी रितिकाला जाऊन विचारले होते की, तू माझ्या द्विशतकानंतर रडत का होती? मी जेव्हा १९६वी धाव घेत होतो तेव्हा मला विकेट वाचवणे महत्वाचे होते. त्यावेळी विकेट वाचवण्यासाठी मी डाइव्ह मारली होती. जेव्हा मी डाइव्ह मारली तेव्हा रितिकाला वाटले की माझा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे रितिका माझ्या द्विशतकापर्यंत रडत होती.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here