भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सतत चर्चेत असतात. आता तर या दोघांचा घटस्फोट झाला आहे, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. नेमकं घडलंय तरी काय, जाणून घ्या फॅक्ट चेक…

अनुष्का ही फक्त अभिनेत्री नाही तर ती आता निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. अनुष्काने एका बेव सीरिजची निर्मिती केली होती. या बेव सीरिजमध्ये काही गोष्टी आक्षेपार्ह दाखवल्या होत्या आणि त्या गोष्टी करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असे भाजपाच्या एका आमदाराने सांगितले होते. त्यानंतर अनुष्काविरोधात तक्रार दाखल करायलाही हेभाजपाचे आमदार गेले होते.

नेमके घडले तरी काय…अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमुळे अनुष्कावर भाजप नेत्याची प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप नेता नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्याचबरोबर विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, अशी मागणीही गुर्जर यांनी केली होती.

आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आरोप केला की, वेब सीरिजमध्ये त्यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला. तसंच अशाप्रकारे अनुष्का सनातन धर्मातील सर्व जातींमध्ये वैर वाढवत आहे. गुर्जर म्हणाले की, ‘पाताललोक वेबसीरिजमध्ये बाळकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नेता एका रस्त्याचं उद्घाटन करत असताना माझा आणि अत्य भाजप नेत्यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मी भाजपचा आमदार आहे आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय माझ्या फोटोचा वापर केला गेला आहे. ही वेबसीरिज राष्ट्रविरोधी कार्य करत आहे.’

नंदकिशोर यांच्यामते, या वेबसीरिजमधून अनुष्का पाकिस्तानची प्रतिमा सुधारू पाहत आहे. एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा असा सल्लाही दिला आहे. त्यांच्यामते, विराट देशभक्त आहे तो देशासाठी खेळतो. पण अनुष्का मात्र पाकिस्तानची प्रतिमाा सुधारण्यात व्यग्र आहे.

या साऱ्या गोष्टींनंतर आज ट्विटरवर विराट अनुष्काला घटस्फोट देणार, या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामध्ये सत्य नव्हते. विराट आणि अनुष्का यांनी घटस्फोट घेतलेला नाही आणि सोशल मीडियावर सुरु असलेला ट्रेंड खोडसाळपणाचा होता. पण दिवसभर ट्विटरवर #VirushkaDivorce असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. चाहत्यांनी यावेळी चांगलीच फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here