वाचा-
विराटने रविवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो रनिंग करताना दिसतोय. या व्हिडिओला कॅप्शन द्या असे आवाहन विराटने चाहत्यांना केले. आता तुम्हाला वाटेल की विराटच्या व्हिडिओमध्ये असे आहे तरी काय? विराटने रनिंगच्या व्हिडिओला एक हटके इफेक्ट दिला आहे. यावर सोशल मीडियावर चाहते कमेंट देत आहेत. अनेकांनी त्याच्या फिटनेसचे कौतुक केलय.
वाचा-
करोना व्हायरसमुळे सध्या देशभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. सर्व क्रिकेटपटू घरीत थांबून फिटनेसची काळजी घेत असून यात विराट आघाडीवर आहे.
लॉकडाऊनच्या काळात इस्टाग्रामवर पोस्ट करून विराटने ३.६ कोटी रुपये कमावले आणि यासाठी फक्त त्याने सोशल मीडियावर ३ पोस्ट केल्या होत्या. इस्टाग्रामवर शेअर करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे. लॉकडाऊनच्या काळात विराटने तीन पेड पोस्ट केल्या. यातील प्रत्येक पोस्टसाठी त्याला १.२ कोटी रुपये मिळाले. विराटचे इस्टाग्रामवर ६.२ कोटी फॉलोअर्स आहेत.
इस्टाग्रामवर एखादी पोस्ट शेअर करण्यासाठी १५ ते २० मिनिट लागतात. यासाठी विराटला १.२ कोटी इतकी रक्कम मिळाले आहेत. यावरून विराटची ब्रॅड व्हॅल्यू किती असेल हे लक्षात येते. इस्टाग्राम पोस्ट करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. त्याने १७.९ कोटी इतकी कमाई केली. दुसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी असून त्याने ४ पोस्ट करून १२.३ कोटी रुपये कमावलेत. तर ब्राझीलचा स्टार खेळाडू ज्युनिअर नेमारने तिसऱ्या स्थानावर असून त्याने ४ पोस्टसह ११.४ कोटी कमाई केली. एनबीएचा स्टार शकील ओनीलने १६ पोस्ट करून ५.५ कोटी रुपये कमावलेत. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमने ३ पोस्ट करून ३.८ कोटी रुपये कमावले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times