नवी दिल्ली: जगतात असे अनेक खेळाडू झाले आहेत ज्यांनी त्याच्या कामगिरीमुळे इतिहासात नाव नोंदवले. क्रिकेटमध्ये एकेकाळी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा दबदबा होता. या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने विरोधी संघावर दहशत ठेवली होती. क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे ज्याला फासावर लटकवण्यात आले होते. हा खेळाडू वेस्ट इंडिजचा होता.

वाचा-
ऐकताना आणि वाचताना थोडे अजब वाटते. पण क्रिकेटच्या इतिहासात असा एकमेव खेळाडू आहे ज्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. वेस्ट इंडिजचा माजी जलद गोलंदाज असे खेळाडूचे नाव होय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिल्टनने असे काय केले होते ज्यामुळे त्याला फाशी देण्यात आली.

वाचा-
१९५५ साली हिल्टनला पत्नीचा खुन केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आणि फाशीची शिक्षे दिली. हिल्टनने करिअरमध्ये ६ कसोटी सामन्यात १६ विकेट घेतल्या होत्या. तर प्रथम श्रेणीचे ४० सामन्यात १४० विकेट घेतल्या. १९३५ साली हिल्टनने इंग्लंडविरुद्ध ब्रिजटाऊन कसोटी पदार्पण केले. इंग्लंडने हा सामना चार विकेटने जिंकला होता. पदार्पणाच्या सामन्यात हिल्टनने ४ विकेट घेतल्या होत्या.

का केली पत्नीची हत्या
लेस्सी हिल्टनने १९४२ साली लर्लिन रोझ सोबत विवाह केला होता. दोघांचे वैवाहिक आनंदी होते. पण १९५४ साली त्यांच्यात मतभेद सुरू झाले. रोझ ड्रेस मेकिंगच्या बिझनेससाठी वारंवार न्यूयॉर्कला जात असे. तेथे ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. याच काळात हिल्टनला एक पत्र मिळाले. या पत्रात रोझचे अफेयर सुरू असल्याचे म्हटले होते.

वाचा-
रोझ जेव्हा न्यूयॉर्कवरून परत आली तेव्हा हिल्टनने तिला जाब विचारला. रोझने असे काहीच नसल्याचे स्पष्ट केले. ती आणि रॉय फ्रान्सिस फक्त मित्र असल्याचे सांगितले. पण काही दिवसात रॉयने लिहलेली चिठ्ठी हिल्टनला मिळाली आणि त्याला राग अनावर झाला.

संबंधित पत्रावरून दोघांच्या वाद झाला. रागात हिल्टनने बंदूक घेतली आणि गोळ्या झाडल्या. कोर्टात सुनावणी दरम्यान हिल्टनने युक्तीवाद केला की, तो स्वत:ला गोळ्या मारणार होता. पण चुकीन रोझला लागली. कोर्टाने हा युक्तीवाद मान्य केला नाही. कारण लर्लिन रोझला एक-दोन नव्हे तर ७ गोळ्या लागल्या होत्या. अखेर २० ऑक्टोबर १९५४ रोजी पत्नीचा हत्या केल्याप्रकरणी हिल्टनला फाशी देण्यात आली.

हिल्टनला १७ मे १९५५ रोजी फासावर लटकवण्यात आले. ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली त्याच दिवशी केंसिंग्टन ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना सुरू होता. तेव्हा मैदानात काही प्रेक्षक ‘फाशी थांबवा, हिल्टनला वाचवा’ असे आवाहन करणारे फलक घेऊन आले होते. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. क्रिकेटच्या इतिहासात फाशीची शिक्षा झालेला हिल्टन हा एकमेव क्रिकेटपटू ठरला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here