वाचा-
भारताचा माजी जलद गोलंदाज हा सुरूवातीला एक फलंदाज होता. पण नंतर त्याने गोलंदाजी करण्यास सुरूवात केली. अजित आगरकरने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. त्याने हे शतक क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या मैदानावर केले होते. गॉड ऑफ क्रिकेट अशी ओळख असलेल्या सचिनला शतकांचे शतक करता आले पण तो लॉर्ड्स मैदानावर कधी शतक करू शकला नाही.
वाचा-
यासंदर्भात बोलताना आगरकर म्हणाला, लॉर्ड्सवर कधी शतक करता न आल्याबद्दल मी कधीच सचिनची चेष्टा केली नाही. मी कधी याविषयावर बोललो नाही. एकदा केकेआरमध्ये रिकी पॉन्टिंगला गंमतीने विचारले होते की लॉर्ड्सवर किती शतक केली आहेस म्हणून, पण सचिनला कधीच असे विचारले नाही. सचिन प्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंगला लॉर्ड्सवर शतक करता आले नाही.
वाचा-
आगरकरने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर २५ ते २९ जून २००२ या काळात झालेल्या कसोटी सामन्यात शतक केले होते. त्याने १०९ धावा केल्या होत्या. या डावात आगरकरने आशीष नेहरासोबत १०व्या विकेटसाठी ६३ धावांची भागिदारी केली. अर्थात आगरकरच्या शतकाचा टीम इंडियाला विशेष फायदा झाला नाही. कारण या सामन्यात भारताचा १७० धावांनी पराभव झाला होता.
लॉर्ड्स मैदानावरील माझे एक शतक सचिन आणि पॉन्टिंग सारख्या दिग्गज खेळाडूंच्या विक्रमासोबत बदलण्यास मी तयार आहे. या दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक काही कमावले आहे. त्यामुळे त्यांना लॉर्ड्सवरील शतका संदर्भातील प्रश्न विचारणे चुकीचे असल्याचे तो म्हणाला.
वाचा-
ओकट्री स्टोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर बोलताना आगरकर म्हणाला, क्रिकेटमधील माझी सुरूवात फलंदाज म्हणून केली होती. पण नंतर गोलंदाजीकडे वळले. हा एक योग्य निर्णय होता आणि त्यासाठी सचिन तेंडुलकरने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
लॉर्ड्सवर शतक करू न शकलेले दिग्गज…
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times