वाचा-
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट संघातील एकमेव हिंदू खेळाडू असलेला माजी क्रिकेटपटू याने सौरव गांगुलीने आयसीसीचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. इंग्लिश काऊंटी मॅच दरम्यान मॅच दरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी दानिशवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. जर गांगुली अध्यक्ष झाला तर आपल्याला न्याय मिळण्यासाठी आयसीसीकडे पुन्हा एकदा अर्ज करेन असे दानिशने म्हटले.
वाचा-
एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानिशला बंदी विरुद्ध पुन्हा आयसीसीकडे अर्ज करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला, जर गांगुली अध्यक्ष झाला तर मी नक्कीच अर्ज करेन आणि मला आशा आहे की ते माझी नक्की मदत करतील.
वाचा-
दानिशने पाकिस्तान संघाकडून २६१ कसोटी विकेट घेतल्या आहेत. दानिश पेक्षा फक्त वसीम अकरम, वकार युनुस आणि इम्रान खान यांनी अधिक विकेट घेतल्या आहेत. एसेक्स संघाकडून खेळताना स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप दानिशवर करण्यात आला होता. फिरकीपटू असलेल्या दानिशने हे आरोप मान्य केले नव्हते. अखेर २०१८ मध्ये त्याने फिक्सिंग केल्याचे मान्य केले.
वाचा-
गांगुली एक चांगला क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमधील बारकावे त्याला समजतात. भारतीय क्रिकेटला गांगुलीने पुढे नेले आहे. जर तो आयसीसीचा अध्यक्ष झाला तर क्रिकेटची आणखी प्रगती होईल, असे दानिश म्हणाला. आयसीसीचे अध्यक्ष होण्यासाठी गांगुलीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या समर्थनाची गरज नाही, असे दानिशने सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times