लंडन: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाजाचे असायचे. त्यातही सचिनला शतकाच्या जवळ बाद करणे म्हणजे तर स्वत:च्या संघासाठी हिरो होण्याची संधी असायची. सचिनला एकदा नव्वदीमध्ये बाद करणाऱ्या गोलंदाजाने एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

वाचा-
सध्या इंग्लंडच्या संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज टीम ब्रेसनेसने दावा केला की, २०११च्या कसोटी मालिकेत सचिनला १००व्या आंतरराष्ट्रीय शतकापासून रोखल्यानंतर त्याला आणि ऑस्ट्रेलियाचे अंपायर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सचिनने २०११च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९९वे आंतरराष्ट्रीय शतक केले होते. इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात तो ९१ धावांवर खेळत असताना माझ्या चेंडूवर LBW बाद झाला.

वाचा-
‘यॉर्कशर क्रिकेट: कव्हर्स ऑफ’ या पॉडकास्ट कार्यक्रमात ब्रेसनेस म्हणाला, माझा तो चेंडू विकेटच्या बाहेर जात होता. ऑस्ट्रेलियाचे अंपायर टकर यांनी माझ्या अपीलनंतर त्याला बाद दिले. सचिन तेव्हा ८०च्या(९१ धावांवर) आसपास खेळत होता. अंपायर टकर यांनी त्याला बाद दिले नसते तर निश्चित सचिनने शतक केले असते. पण आम्ही मालिका जिंकली आणि जगातील अव्वल क्रमांकाचा संघ ठरलो.

वाचा-
सचिनला बाद केल्यानंतर मला आणि अंपायर टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. ही धमकी एकदा नाही तर अनेक वेळा मिळाल्याचे ब्रेसनेस म्हणाला. मला ट्विटवर आणि घरी पत्र पाठवून धमकी देत असत. तुम्ही सचिनला बाद कसे काय दिले. चेंडू लेग साइडला बाहेर जात होता, असे पत्रात लिहलेले असायचे.

व्हिडिओ पाहा-
जास्त प्रमाणात धमकी मिळत असल्याने टकर यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती, असा दावा ब्रेसनेसने केला. सचिनला बाद केल्यानंतरच्या काही महिन्यांनी टकर मला भेटले आणि त्यांनी सांगितले की, मित्रा मला सुरक्षा कर्मचारी ठेवावा लागला. ऑस्ट्रेलियात टकर यांच्या घराबाहेर पोलिस सुरक्षा देण्यात आली होती.

वाचा-
त्यानंतर सचिन तेंडुलकरने २०१२च्या आशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली आणि शतकांचे शतक पूर्ण केले. ऑक्टोबर २०१३ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनच्या नावावर कसोटीत १५ हजार ९२१ तर वनडेत १८ हजार ४२६ धावा आहेत.

हाच तो चेंडू…

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here