नवी दिल्ली: टी-२० क्रिकेटमुळे आणि कसोटी क्रिकेटचा वेग वाढला आहे. अनेक वेळा ३५० धावा केल्या तरी विजय मिळेल याची हमी देता येत नाही. असे असले तरी वनडे क्रिकेटमध्ये आजपर्यंत कधीच ५०० धाव संख्या झाली नाही. ना महिलांचा संघ ना पुरुषांच्या संघाला अशी कामगिरी करता आली. पण आजपासून दोन वर्षापूर्वी म्हणजे ८ जून २०१८ रोजी अशी एक संधी आली होती जेव्हा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये एक संघ ५००च्या जवळ पोहोचला होता. पण ५०० ही धावसंख्या गाठण्यात त्यांना ९ धावा कमी पडल्या. जाणून घेऊयात त्या सामन्याबद्दल…

वाचा-
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ८ जून २०१८ रोजी न्यूझीलंडच्या महिला संघाने सर्वोच्च धावसंख्या केली. त्यांनी आयर्लंडविरुद्ध ४९१ धावा केल्या. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही एखाद्या संघाने (महिला आणि पुरुष मिळून) केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

वाचा-
डब्लिन येथे झालेल्या या सामन्यात व्हाइट फर्न्स या नावाने ओळखळ्या जाणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमने चार विकेटच्या बदल्यात ४९१ इतकी धावसंख्या केली. पुरुषांच्या क्रिकेटचा विचार केल्यास इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद ४८१ ही सर्वोच्च धावसंख्या केली आहे.

वाचा-
या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कीवीकडून जॅस वॉटकिन आणि सूजी बॅट्स यांनी पहिल्या विकेटसाठी १९ ओव्हरमध्ये १७२ धावांची भागिदारी केली. सूजी १५१ धावांवर बाद झाली. त्यानंतर मॅडी ग्रीनने जॅस सोबत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावा जोडल्या. या सामन्यात मॅडीने १२२ धावा केल्या तर एमलिया कॅरने ४५ चेंडूत वादळी ८१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने ५० षटकात ४९१ धावांचा विशाल स्कोअर केला.

वाचा-
न्यूझीलंडने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १४४ धावांवर बाद झाला आणि कीवीने ३४७ धावांनी हा सामना जिंकला. महिला वनडे क्रिकेटमधील हा चौथ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला

विशेष म्हणजे महिला क्रिकेटमध्ये ५० षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाच्या यादीत पहिले ४ विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहेत.

> ४९१- विरुद्ध आयर्लंड
> ४५५- विरुद्ध पाकिस्तान
> ४४०- विरुद्ध आयर्लंड
> ४१८ विरुद्ध आयर्लंड

भारतीय महिला संघाने वनडेत आयर्लंड विरुद्ध २ बाद ३५८ अशी सर्वोच्च धावसंख्या केली आहे.

पुरुष वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावासंख्या
> इंग्लंड- ६ बाद ४८१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया
> इंग्लंड- ३ बाद ४४४ विरुद्ध पाकिस्तान
> श्रीलंका- ९ बाद ४४३ विरुद्ध नेदरलँड
> दक्षिण आफ्रिका- २ बाद ४३९ विरुद्ध वेस्ट इंडिज

भारताच्या पुरुष संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध ५ बाद ४१८ ही सर्वोच्च धावसंख्या केली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here