नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात या वर्षी होणाऱ्या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी वर्ल्ड कप होणार की नाही याबाबतचा निर्णय १० जून रोजी होणाऱ्या बैठकीत घ्यावा लागेल. जर यावर्षी होणारी स्पर्धा स्थगित झाली तर त्या जागी स्पर्धा आयोजित केली जावी, असे मत एका दिग्गज खेळाडूने व्यक्त केले आहे.

वाचा-
वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी गोलंदाज म्हणाले की, आयसीसीने टी-२० वर्ल्ड कपच्या बदल्यात आयपीएल बद्दल विचार करावा. जर वर्ल्ड कप स्पर्धा नियोजित वेळानुसार होणार नसले तर बीसीसीआयला ऑक्टोबर-नोव्हेंबरचा कालावधी मिळतो. एका इस्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये बोलताना होल्डिंग यांनी आयपीएलसाठी वेळ देण्याबाबत आयसीसीने वेळ घालवू नये, असे मत व्यक्त केले.

वाचा-

मला वाटात नाही की आयसीसीकडून आयपीएलला वेळ देण्यासाठी टी-२० वर्ल्ड कप बाबत निर्णय घेण्यात उशीर केला जात आहे. ऑस्ट्रेलिया सरकारचे काही नियम आहेत. तेथे विशिष्ठ तारखेच्या आता करोनाग्रस्त देशातून व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. जर टी-२० वर्ल्ड कप झाला नाही तर बीसीसीआयकडे आयपीएल आणि अन्य देशांतर्गत क्रिकेट सामने खेळवण्याचा अधिकार आहे. यासाठी त्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर ही वेळ देखील मिळते.

वाचा-
करोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून चेंडूवर थुंकी लावण्यावर बंदी घालण्याच्या आयसीसीच्या प्रस्तावावर ते म्हणाले, गोलंदाजांनी याशिवाय चेंडू टाकण्याची तयारी ठेवली पाहिजे. खेळाडूंसाठी आयसीसीने तयार केलेले नवे नियम उपयोगात आणण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्णद्वेषावर म्हणाले…
गेल्या काही दिवसात क्रिकेटमधील वर्णद्वेषावर अनेक क्रिकेटपटू बोलत आहेत. यावर होल्डिंग म्हणाले, जोपर्यंत समाज वर्णद्वेषाविरुद्ध एकत्र येत नाही तोपर्यंत खेळातील या बाबतचे नियम म्हणजे जखमेवर वरवरची मलमपट्टी केल्यासारखी आहे. केवळ कडक नियम करून वर्णद्वेष थांबवता येणार नाही. वर्णद्वेष तुम्हाला जवळजवळ सर्वच ठिकाणी दिसेल. लोक क्रिकेट, फुटबॉल मैदानात त्याचा वापर करतात. तुम्ही फक्त खेळाच्या माध्यमातून तो नष्ट करू शकणार नाही. तो समाजातून नष्ट केला पाहिजे.

होल्डिंग यांनी १९७५ ते १९८७ या काळात वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी ६० कसोटीत २४९ विकेट तर १०२ वनडेत १४२ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणीतील २२२ सामन्यात ७७८ तर लिस्ट एमधील २४९ सामन्यात ३४३ विकेट घेतल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here