करोनामुळे बऱ्याच देशांतील व्यवहार ठप्पा पडले आहेत. बरीच लोकं आपल्या घरांमध्येच आहेत. ज्यांना करोनाची बाधा झाली आहे, त्यांना क्वारंटाइन केलं जात आहे. बऱ्याच लोकांचे व्यवसाय बुडाले आहेत. बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे काही देशांमध्ये करोनामुळे चिंताग्रस्त परिस्थिती आहे.
एकिकडे करोनामुळे चिंतेचे वातावरण असले तरी एक संपूर्ण देश करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. कारण न्यूझीलंडमध्ये सोमवारी एकही करोना बाधित व्यक्ती सापडलेली नाही. त्याचबरोबर गेल्या १७ दिवसांमध्ये कोणालाी करोना झाल्याचे पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे आता न्यूझीलंडमधून करोना पळून गेल्याचे म्हटले जात आहे.
करोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेम्स निशामने एक ट्विटरवर मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये त्याने देशवासियांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये जेम्स म्हणाला की, ” करोनामुक्त झाल्याबद्दल न्यूझीलंडमधल्या सर्वांचे अभिनंदन. पुन्हा एकदा न्यूझीलंडवासियांनी एक चांगली गोष्ट दाखवून दिली आहे. जर योग्य प्लॅनिंग केले आणि त्याची अंमलबजावणी केली तर नक्कीच आपण यश मिळवू शकतो, हे यामधून पाहायला मिळते.”
सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिलनंतर एकही करोनाचा पेशंट सापडलेला नाही. त्यामुळेच आता आगामी दहा दिवसांमध्ये न्यूझींडमध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times