करोना व्हायरसचा प्रसार चीनमधून झाल्याचे म्हटले जात आहे. पण चीन करोना व्हायरसमधून पूर्णपणे सावरला आहे, असे आता म्हटले जात आहे. पण एक धक्कादायक प्रकार चीनमध्ये पाहायला मिळाला आहे.

चीनमध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. त्यामुळे खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. सराव संपल्यावर काही खेळाडू मद्यपान करत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर गदा आली असून त्यांना मोठ्या करवाईला सामोरे जावे लागत आहे.

शांघाई येथे चीनच्या १९ वर्षांखालील फुटबॉलचा संघ सराव करत आहे. सराव संपल्यावर काही खेळाडू रात्रभर मद्यपान करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. हे खेळाडू आता सहा महिने तरी फुटबॉल खेळू शकणार नाही, असे चीनच्या फुटबॉल संघटनेने स्पष्ट केले आहे. कारण करोनानंतर मद्यपान करण्यासाठी संघातील तीन खेळाडू बाहेर गेले होते. आता त्यांना ही गोष्ट चांगलीच महागात पडली आहे.

करोना व्हायटरसनंतर जग बदलले आहे. त्यामुळे आता कोणत्या गोष्टी कराव्या आणि करू नये, याबाबत काही नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन जर केले नाही तर पुन्हा एकदा लोकांना करोनाचा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे जो हे नियम मोडेल त्यांच्यावर कडक कारवाई चीनमध्ये करण्यात येत आहे.

याबाबत चीनच्या फुटबॉल संघटनेने सांगितले की, ” प्रत्येक खेळाची, संघाची एक शिस्त असते आणि त्यानुसारच तुम्हाला वागायचे असते. चीनच्या १९ वर्षांखालील फुटबॉल संघातील खेळाडू ३० मे या दिवशी रात्री मद्यपान करत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही केली आहे. आता नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांना कोणताही सामना खेळता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना कोणतेही भत्तेही मिळणार नाहीत.”

या कारवाईनंतर या खेळाडूंना सहा महिने खेळाबाबत काहीही करता येणार नाही . आता त्यांना जर संघात परत यायचे असेल तर त्यांना आपले वर्तन सुधारावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना चीनच्या संघात पुन्हा प्रवेश मिळू शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here