करोना व्हायरसमुळे बरेचसे क्रीडापटू आपल्या घरीच बसलेले आहे. पण घरी बसून ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. या गोष्टीमध्ये सर्वात आघाडीवर आहे तो ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर. कारण जवळपास दररोज वॉर्नर हा मनोरंजन करणारे व्हिडीओ बनवत असून ते चांगलेच व्हायरल होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. वॉर्नरचा आजचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धा सुरु नसल्या तरी वॉर्नर हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्याने बऱ्याच चाहत्यांची मने जिंकली आहे. गेले काही दिवस तो बॉलीवूडच्या गाण्यांवर व्हिडीओ बनवत असल्याचेही पाहायला मिळाले आहे. आता वॉर्नरने आज जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, तो चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक खास गोष्ट वॉर्नरने सांगितली आहे.

वॉर्नरच्या डोक्यात व्हिडीओबाबत आतापर्यंत भन्नाट कल्पना आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. कधी वॉर्नर बाहुबली झाला होता, तर कधी मिस्टर इंडिया. व्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने आपले दातही तोडून घेतले होते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांबरोबर त्याने बरेच व्हिडीओ बनवलेले होते. त्यामुळे आता वॉर्नरने या व्हिडीओमध्ये नवीन कोणती पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

वॉर्नरने आतापर्यंत बरेच व्हिडीओ बनवले आहेत. या सर्व व्हिडीओमधले महत्वाचे क्षण त्याने एकत्र करत एक व्हिडीओ बनवला आहे. आतापर्यंतचे माझी ही इनिंग तुम्हाला कशी वाटली, असा प्रश्नही वॉर्नरने यावेळी विचारला आहे.

वॉर्नरने एक भन्नाट व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओमध्ये वॉर्नर ‘मिस्टर इंडिया’सारखा गायब झाल्याचे पाहायला मिळाले होते. या व्हिडीओमधून वॉर्नर गायब कसा झाला, हे कोडे चाहत्यांना अजूनही उलगडलेले नाही.

शुक्रवारी वॉर्नरने अक्षय कुमारचा सुपरहिट गाण्यावर भन्नाच डान्स केल्याचे समोर आले होते. वॉर्नरनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला होता. आज केलेल्या व्हिडीओमध्ये वॉर्नरने सुरुवातीला आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची जर्सी परीधान केली होती. त्याच्या मुलीने एक ड्रेस परीधान केला होता. पण या व्हिडीओमध्ये तर या दोघांकडे ड्रेस बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबाद संघाची जर्सी घातलेला दिसतो, पण त्यानंतर वॉर्नर हा मुलीच्य ड्रेसमध्ये दिसत आहे. दुसरीकडे वॉर्नरच्या मुलीनेही सनरायझर्स हैदराबाद संघाची जर्सी घातल्याचे पाहायला मिळत आहे. हा बदल झाला तरी कसा, हे चाहते पाहत असून त्यांनी हा व्हिडीओही व्हायरल केला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here