मुंबईमध्ये आजपासून Unlock 1.0 सुरु करण्यात आले आहे. पण पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी नियम मोडल्याचे पाहाला मिळाले आहे. मुंबईकरांनी आज सकाळीच मरीन ड्राइव्ह आणि बँड स्टँड या परिसरात नियम मोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांच्यावर एक माजी क्रिकेटपटूचांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

आजपासून मुंबई लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. बऱ्याच लोकांना कामावर जाण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकांना दैनंदिन व्यवहार करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी लोकांनी एकच गर्दी केल्याचे आता पाहायला मिळाले आहे. त्यामुळए ल़कडाऊन पुन्हा लागणार का, याची भिती आता व्यक्त होत आहे.

आज मॉर्निंग वॉकसाठी लोकांनी मरीन ड्राइव्ह आणि बँड स्टँड या परिसरात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सर्व नियम लोकांनी धाब्यावर बसवले होते. या अशा वागण्यामुळे करोनाचे संकट अजून वाढू शकते. त्यामुळे ही देण्यात आलेली मुभा सरकार पुन्हा एकदा काढून घेऊ शकते, अशी शँका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुढे लोकांनी नियम पाळावेत, असे या माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे.

का
य म्हणाला क्रिकेटपटू…मॉर्निंग वॉकसाठी लोकांनी मरीन ड्राइव्हवर केलेली गर्दी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा चांगलाच भडकलेला होता. तो म्हणाला की, ”
” आजच्या पहिल्याच दिवशी मॉर्निंग वॉकसाठी लोकांनी मरीन ड्राइव्ह आणि बँड स्टँड येथे एकच गर्दी केली होती. पोलिस या लोकांना नियमांबद्दल सुचना करत होते. पण लोकांनी हे नियम पाळले नाहीत. लोकांनी सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना काही नियम पाळायला हवेत.”

क्रिकेटपटू झाला ट्रोलआकाश चोप्रा आपल्या एक ट्विटमुळे चांगलाच ट्रोल झाल्याचेही पाहायला मिळाले. आजपासून मॉल, दुकाने, मंदिरं आणि काही ठिकाणी हॉटेल्स उघडण्यात आली. यावर चोप्राने एक ट्विट केले होते. तो म्हणाला की, ” आर्थिक घडी नीट बसण्यासाठी मॉल, दुकाने आणि काही ठिकाणी हॉटेल्स आजपासून उघडण्यात आली, हे एखाद वेळएस समजू शकतो. पण मंदिरं का उघण्याचा निर्णय घेतला हे मात्र कळत नाही, कारण देव सर्वत्र आहे.” या ट्विटनंतर चोप्राला लोकांनी चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here