हसीनने एका पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हसीन एका मैत्रिणीबरोबर आहे. हसीनची ही मैत्रिण हुक्का ओढत आहे, त्याचबरोबर ती मद्यपान करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी पार्टीमध्ये एक पंजाबी गाणं सुरु आहे. या गाण्यावर हसीन आणि तिची मैत्रिण डुलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाने न्यूड फोटो शेअर केला होता. या न्यूज फोटोमध्ये आपल्याबरोबर असलेली व्यक्ती ही शमी असल्याचेच तिने सांगितले होते. या फोटोमध्ये तिने एक मेसेज लिहला होता. या मेसेजमध्ये तिने शमीवर आरोप करण्याची संधी सोडली नव्हती. हसीनने जेव्हा शमीवर आरोप केले होते, तेव्हा ती चांगलीच ट्रोल झाली होती. त्याचबरोबर शमीने हसीनला यावेळी उत्तरही दिले होते. शमीने सोमवारी करोना लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या गरजूंना मदत करत असल्याचा फोटो शेअर केला. स्वत: शमी प्रवासी मजूरांना जेवण आणि फळ देत होता. याचवेळी शमीने पत्नी हसीनाने केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तिने केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. हसीनाने हे आरोप सिद्ध करून दाखवावेत. माझा आता हसीनासोबत काहीही संबंध नाही, असेही सांगितले होते.
शमीने उत्तर दिल्यानंतर हसीनने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हसीनने शमी आणि तिला ट्रोल करणाऱ्या टीकाकारांना उत्तरही दिले होते. या व्हिडीओमध्ये हसीन डान्स करताना दिसत आहे. हसीनबरोबर एक पुरुषही या व्हिडीओमध्ये डान्स करत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना हसीनने एक मेसेजही लिहिला आहे. हसीनने या व्हिडीओखाली लिहिले आहे की, ” काहीही सिद्ध करण्यासाठी हे आयुष्य फारच लहान आहे.” त्यामुळे आता काय सिद्ध करायचे आणि काय नाही, असेच हसीनने या मेसेजच्या माध्यमातून शमी आणि टीकारारांना सांगितले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times