दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण या सामन्यापूर्वी मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बरळला आहे. आफ्रिदीच्या वक्तव्यामुळे भारताचे सोडा पाकिस्तानच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आफ्रिदी या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिव्या खाणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामान कोण जिंकेल, असे एका चाहत्याने सोशल मीडियावर विचारले होते. या चाहत्याच्या प्रश्नाला शाहिद आफ्रीदीने ट्विटरवर उत्तर दिलं आहे. आफ्रिदीने यावेळी उत्तर देताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही संघाची बाजू घेतलेली नाही. पण त्याचवेळी हा सामना कोण जिंकेल, याचे समर्पक उत्तर त्याने दिले आहे. आफ्रीदी हा नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने बोलत असल्याचे पाहायला मिळत होते. पण आफ्रीदीने यावेळी क्रिकेटच्या भाषेत उत्तर दिले आहे. चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना आफ्रिदीने म्हटले आहे की, “जो संघ कमी चुका करेल, तोच संघ विजयी ठरेल.”

afridi


आशिया चषकात किती सामने होतील, जाणून घ्या…
आशिया कपमध्ये ६ संघ सहभागी होत आहेत. हे ६ संघ दोन गटात विभागलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान आहेत. पात्रता फेरीतून एक संघ निवडला जाईल. २१ ऑगस्टपासून हाँगकाँग, यूएई, कुवेत आणि सिंगापूर या ४ संघांमधील पात्रता फेरी सामने सुरू झाले आहेत. पात्रता फेरीतील विजेता संघ भारत-पाकिस्तान गटात असेल. सहभागी झालेल्या या ६ संघांमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. यातील १० सामने दुबईत तर तीन सामने शारजाहमध्ये होणार आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमधील सर्व संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जातील. यानंतर टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये पोहोचतील, जिथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध ६ सामने खेळतील. त्यानंतर सुपर-४ मधील टॉप-२ संघ अंतिम फेरीत विजेतेपदाचा सामना खेळतील. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या स्पर्घेत आता कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here