नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. विराटच्या या व्हिडिओवरून क्रिकेट जगतात आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की, विराट टिकटॉकवर आला आहे.

वाचा-
विराटने गेल्या रविवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तो रनिंग करताना दिसतोय. या व्हिडिओला कॅप्शन द्या, असे आवाहन विराटने चाहत्यांना केले होते. विराटने रनिंगच्या व्हिडिओला एक हटके इफेक्ट दिला होता. यावर सोशल मीडियावर चाहते कमेंट देत आहेत. अनेक जण त्याच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत त्याच बरोबर काही जण विचारत आहे की विराट टिकटॉकवर आला की काय.

वाचा-

फक्त चाहतेच नाही तर काही क्रिकेटपटूंनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पिटरसन यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नर आणि पिटरसन हे दोघेही टिकटॉक वापरतात. या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळेच चाहत्यांना प्रश्न पडला आहे की खरच विराट टिकटॉकवर आली की काय.

अनेक चाहत्यांनी टिकटॉक अॅपवर विराटचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाल नाही. विराट टिकटॉकवर आला असा अंदाज व्यक्त करणाऱ्या वॉर्नर आणि पिटरसन यांची देखील चुकी नाही कारण विराटने शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तो टिकटॉकवर केल्यासारखा वाटतो.

करोना लॉकडाऊनच्या काळात विराट सोशल मीडियावर सक्रीय आहे. करोना व्हायरसपासून काळजी घेण्यापासून ते अन्य अनेक गोष्टींवर विराट सोशल मीडियावर त्याची मते व्यक्त करत असतो. गेल्या काही दिवसात विराटने त्याच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहे. पण यावेळी त्याने शेअर केलेला व्हिडिओ थोडा हटके ठरला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here