वाचा-
अझरने सोमवारी स्टोर्ट्स क्रीडा या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करिअरमधील सर्वात बोल्ड निर्याबद्दल सांगितले. अझर भारतीय संघाचा कर्णधार असताना सचिन तेंडुलकरला म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला होता. सचिनला सलामीवीर पाठवण्याबाबतच्या निर्णयाची पूर्ण स्टोरी अझरने सांगितली.
वाचा-
सचिन खुप चांगला खेळत होता. तो स्वत:हून माझ्याकडे सलामीला खेळण्यासाठी पाठवावे यासाठी आला नव्हता. पण मला जाणीव झाली होती की तो आक्रमक फलंदाज आहे आणि क्रमांक चार किंवा पाचवर फलंदाजी करत ३०-४० धावा करणे ही जागा त्याच्यासाठी योग्य नाही. तेव्हाच भारताचा नियमीत सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू सामना सुरू होण्याआधी अनफिट झाला. आता त्याच्या जागी सलामीवीर म्हणून कोणाला पाठवायचे असा प्रश्न कर्णधार आणि संघ व्यवस्थापनापुढे होता. तेव्हा मी संघाचे व्यवस्थापक अजीत वाडेकर यांच्याशी चर्चा केली आणि सचिनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला, असे अझरने सांगितले.
वाचा-
आम्हाला (मला आणि वाडेकर) वाटले की खेळाडूंना संधी दिली पाहिजे. याचा संघाला फायदा झाला. २१ व्या वर्षी सचिनने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. पहिल्या डावातच त्याने धमाकेदार खेळी केली. सलामीवीर म्हणून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर सचिनचे करिअरच बदलले. त्याने करिअरमध्ये ४६३ सामन्यात ४९ शतक केली. यातील ४५ शतक सलामीवीर म्हणून केली.
सचिनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती, या प्रश्नावर अझर म्हणाला, तो प्रचंड आनंदी झाला. त्याला पहिल्या पासूनच सलामीला खेळण्याची इच्छा होती. तुम्ही एखाद्याची प्रतिभा दाबून ठेऊ शकत नाही. सचिनकडे ती होती. मी फक्त त्याला सपोर्ट केला आणि सलामीवीर म्हणून त्यालाच संधी देण्याचे निश्चित केले.
वाचा-
१९९८ साली निवड समितीने सचिनला बांगलादेशविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यास सांगितले होते. त्याने चौथ्या क्रमांकावर ८० धावा केल्या. पण मला जाणीव झाली की ती जागा सचिनसाठी नाही. मी पुन्हा त्याला सलामीला पाठवले. त्यावरून भारतात आल्यानंतर बीसीसीआयकडून मला ओरडा खावा लागल्याचे अझर म्हणाला.
वाचा-
१९९४ साली सचिनने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम सलामीवीर म्हणून पदार्पण केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव भारताने फक्त १४९ धावांवर संपुष्ठात आणला. भारतासमोर मोठे लक्ष्य नव्हते. सचिनने डावाची सुरूवात धमाकेदार केली. जवळ जवळ प्रत्येक चेंडू सीमेच्या पलिकडे जाऊ लागला. सचिनच्या आक्रमक खेळीने न्यूझीलंडचे गोलंदाज देखील हैराण झाले. या सामन्यात सचिनने ४९ चेंडूत ८२ धावा केल्या. यात १५ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. भारताने हा सामना २३.२ षटकात ३ विकेटच्या बदल्यात जिंकला.
सलामीवीर म्हणून प्रथम फलंदाजीला आलेल्या सचिनचा व्हिडिओ
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times