करोनाचे संकट सध्याच्या घडीला जगभरातील काही देशांमध्ये अजूनही घोंघावते आहे. जोपर्यंत करोनाला पळवत नाही तोपर्यंत क्रीडा स्पर्धा लवकर सुरु होणार नाहीत. पण जर का तुम्ही करोनाला पळवले तर तुम्ही स्टेडियममध्येही सामना पाहायला जाऊ शकता. ही गोष्ट जर तुम्हाला खरी वाटत नसले तर ज्या देशाने करोनाला पळवले आहे, त्या देशामध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर हा सामना पाहण्यासाठी तब्बल २० हजार लोकांनी सामना पाहिल्याचे आता समोरही आले आहे.

शिस्तीच्या मार्गाने करोनाला आपल्या देशातून पळवल्यावर न्यूझीलंडमध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका सामन्यात तर तब्बल २० हजार प्रेक्षकांनी सामना पाहिल्याचे आता पुढे आले आहे. यानंतर जो दुसरा सामना होणार आहे. त्यामध्ये तर ३५ हजार चाहते उपस्थित राहणार असल्याचे समजत आहे. कारण या सामन्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही सहभाग असणार आहे.

वाचा-

करोनामुक्त होण्याचा हा आहे फॉर्म्युलाकरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेम्स निशामने एक ट्विटरवर मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये त्याने देशवासियांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये जेम्स म्हणाला की, ” करोनामुक्त झाल्याबद्दल न्यूझीलंडमधल्या सर्वांचे अभिनंदन. पुन्हा एकदा न्यूझीलंडवासियांनी एक चांगली गोष्ट दाखवून दिली आहे. जर योग्य प्लॅनिंग केले आणि त्याची अंमलबजावणी केली तर नक्कीच आपण यश मिळवू शकतो, हे यामधून पाहायला मिळते.”

वाचा-

न्यूझीलंड सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिलनंतर एकही करोनाचा पेशंट सापडलेला नाही. त्यामुळेच आता आगामी दहा दिवसांमध्ये न्यूझींडमध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

सध्याच्या घडीला करोनाचे संकट सर्वात मोठे आहे. जोपर्यंत करोनाला पळत नाही तोपर्यंत तुम्ही सामान्य आयुष्य जगू शकत नाही. पण जर नियम पाळले आणि शिस्त राखली गेली तर नक्कीच आपण करोनाला पळवू शकतो आणि पुन्हा एकदा जुने दिवस तुम्ही अनुभवी शकता. न्यूझीलंडसारख्या देशाने हीच गोष्ट केली असून तेथील जनजीवन आता सुरळीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here