आयपीएमध्ये खेळताना वर्णद्वेषाचा मी बळी ठरलो होतो, असे वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने सांगितले होते. त्यानंतर आपल्याला हिणवणाऱ्या या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची सॅमीने धमकीही दिली होती. पण आता सॅमीला ‘कालू’ म्हणणारा भारतीय क्रिकेटपटू सापडला आहे. त्यामुळे आता या क्रिकेटपटूचे करिअर धोक्याचे आल्याचे म्हटले जात आहे.

सॅमी म्हणाला होता की, “आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून खेळायचे तेव्हा मला आणि परेरा यांना कालू या नावाने हाक मारली जायची. मला पहिला वाटायचे की याचा अर्थ ताकदवान घोडा असेल. पण आता या शब्दाचा अर्थ समजल्यावर मला प्रचंड राग आला आहे. आयपीएलमध्येही वर्णद्वेष होतो आणि त्याचा मीदेखील शिकार ठरलो आहे.”

त्यामध्ये सॅमीने आपल्याबरोबर कसा वर्णद्वेष झाला आणि आपल्याला कसे हिणवले गेले, याबाबतची गोष्ट सांगितली आहे. सॅमी फक्त एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्याने या सर्व खेळाडूंचे मोबाईल क्रमांक मिळवले आहेत आणि त्यांना एक मेसेजली पाठवला आहे. त्याचबरोबर मला जर तुम्ही माझ्या प्रश्चनाचे उत्तर दिले नाहीत तर तुमचे नाव मी सर्वांना सांगेन, अशी धमकीही त्याने दिली होती. आता तर सॅमीने आपल्याला डिवचणाऱ्या प्रत्येक खेळाडूला धारेवर धरले आहे. ज्या खेळाडूने आपल्याला त्यावेळी हिणवले होते. सॅमीने एक व्हिडीओ बनवला आहे.

सॅमीला कोणत्या भारताच्या खेळाडूने ‘कालू’ म्हटले होते, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल. तर हा खेळाडू आहे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा. इशांत आणि डॅरेन हे दोघेही आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळायचे. यावेळी एका कार्यक्रमात इशांतने सॅमीबरोबर एक फोटो काढला होता. हा फोटो इशांतने इंस्टाग्रामला शेअर केला होता. या फोटोला कॅपेशन देताना इशांतने सॅमीला ‘कालू’ म्हटल्याचे दिसत आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता इशांतवर कारवाई होणर असल्याचे दिसत आहे. या एका प्रकरणामुळे इशांतचे करिअर धोक्यातही येऊ शकते. आता इशांतवर आयसीसी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here