India in Asia Cup 2022 : आशिया कप 2022 साठी (Asia Cup 2022) सर्व संघाची तयारी पूर्ण झाली असून जवळपास सर्व खेळाडूही युएईमध्ये पोहोचले आहेत. 27 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध असणार असून यावेळी भारत नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravidra Jadeja) आशिया कपसाठीच्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान संघानेही आपली नवी जर्सी तयार केली आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघ जाहीर केला असून रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. यावेळी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघात नसल्याने गोलंदाजी युनिटवर थोडं प्रेशर असेल. यावेळी भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान या वेगवान गोलंदाजांसह रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई हे फिरकीपटू संघात असतील. तर नेमका संघ कसा आहे, पाहूया…
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
कसं आहे वेळापत्रक?
आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँग-काँग संघाने पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया…
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट – बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट – भारत विरुद्ध हॉंक काँग
1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हॉंक काँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-
sports