करोनामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन मोठे बदल होणार असल्याचे समोर आले आहे. करोनाननंतर क्रिकट सुरु झाल्यावर या चार निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येऊ शकते.

वाचा-

करोनानंतर क्रिकेट सुरु करायचे झाल्यास खबरदारीचे उपाय घ्यावे लागणार आहे. कारण करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपण ठप्प झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा झालेली नाही. आता करोना व्हायरसचा जोर थोडा कमी झाल्याचे पाहून पुन्हा एकदा क्रिकेट पूर्वपदावर येण्यासाठी सज्ज होत आहे. पण जर यावेळी सुरक्षिततेचे उपाय घेतले गेले नाहीत, तर क्रिकेट पुन्हा बंद करावे लागू शकते.

आयसीसीने नेमके काय बदल केले आहेत…क्रिकेट सुरळीतपणे सुरु करण्यासाठी आयसीसीने ठोस पावले उचलली आहे. करोनानंतर जर क्रिकेट सुरु करायचे असेल तर त्याच्यासाठी दोन महत्वाचे नियम बनवण्यात आले आहेत.

वाचा-

करोना हा संसर्गामुळेही पसरू शकतो. त्यामुळे यापुढे चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी किंवा लाळेचा वापर करू नये, असे आयसीसीच्या क्रिकेट समितीडने ठरवले आहे. जर एखाद्या खेळाडूला करोना झाला असेल आणि त्याने जर चेंडूला थुंकी किंवा लाळ लावली आणि अन्य एका खेळाडूने चेंडूला हात लावला तर त्यालाही करोना होऊ शकतो. त्यामुळे आयसीसीने हा नवीन नियम केला आहे.

वाचा-

आयसीसीने केलेला दुसरा नियम असा आहे की, जर एखाद्या क्रिकेटपटूला करोना झाल्याचे लक्षात आले तर त्याच्या जागी तातडीने राखीव खेळाडू आता घेता येणार आहे. यापूर्वी जर खेळाडू बदलायचा असेल तर आयसीसीकडे विनंती करावी लागायची. आयसीसीने ही विनंती स्वीकारली की, त्यानंतर खेळाडू बदलला जायचा. पण खेळ आणि खेळाडूंना वाचवण्यासाठी आता आयसीसीने नवीन नियम बनवला आहे. त्यामुळे तात्काळ बदली खेळाडू संघात येऊ शकतो. त्याचबरोबर प्रत्येक संघाला आता अतिरीक्त डीआरएसही मिळणार आहे.

सध्याच्या घडीला जर दोन देशांमध्ये सामना सुरु असेल तर पंच त्रयस्थ देशांचे असतात. पण आता करोनानंतर प्रत्येकवेळी त्रयस्थ देशांचे पंच सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये स्थानिक पंचांना हे काम देण्यात येऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here