काही वेळापूर्वीच आयसीसीने करोनानंतर होणाऱ्या क्रिकेटसाठी चार नवीन बदल केले आहेत. सचिननेही एक महत्वाचा बदल आता सुचवला आहे. सचिनने जो बदल सांगितला आहे त्यामुळे गोलंदाजांना जास्त मदत मिळू शकते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला दोन चेंडू वापरले जातात. याचाच अर्थ प्रत्येक चेंडूने २५ षटके टाकली जातात. पण कसोटी क्रिकेटमध्ये एक चेंडू ८० षटकांनंतर बदलला जातो. त्यामुळे काही वेळा गोलंदाजांचे नुकसान होते, याकडे सचिनने बोट दाखवले आहे.
सचिन म्हणाला की, ” एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपण दोन चेंडू वापरतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये ८० षटकांनंतर चेंडू बदलला जातो. ज्यावेळी खेळाडू थं वातावरणात खेळत असताता तेव्हा त्यांना जास्त घाम येत नाही आणि आता तर लाळही चेंडूला चकाकी देण्यासाठी वापरली जाणार नाही. त्यामुळे चेंडूला चकाकी देण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करायला हवा. कसोटी क्रिकेटमध्ये ५० किंवा ५५ षटकांनंतर नवीन चेंडू वापरण्यात आला तर ही समस्याही सुटू शकेल.”
आयसीसीने नेमके काय बदल केले आहेत…करोना हा संसर्गामुळेही पसरू शकतो. त्यामुळे यापुढे चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी किंवा लाळेचा वापर करू नये, असे आयसीसीच्या क्रिकेट समितीडने ठरवले आहे. जर एखाद्या खेळाडूला करोना झाला असेल आणि त्याने जर चेंडूला थुंकी किंवा लाळ लावली आणि अन्य एका खेळाडूने चेंडूला हात लावला तर त्यालाही करोना होऊ शकतो. त्यामुळे आयसीसीने हा नवीन नियम केला आहे.
आयसीसीने केलेला दुसरा नियम असा आहे की, जर एखाद्या क्रिकेटपटूला करोना झाल्याचे लक्षात आले तर त्याच्या जागी तातडीने राखीव खेळाडू आता घेता येणार आहे. यापूर्वी जर खेळाडू बदलायचा असेल तर आयसीसीकडे विनंती करावी लागायची. आयसीसीने ही विनंती स्वीकारली की, त्यानंतर खेळाडू बदलला जायचा. पण खेळ आणि खेळाडूंना वाचवण्यासाठी आता आयसीसीने नवीन नियम बनवला आहे. त्यामुळे तात्काळ बदली खेळाडू संघात येऊ शकतो. सध्याच्या घडीला जर दोन देशांमध्ये सामना सुरु असेल तर पंच त्रयस्थ देशांचे असतात. पण आता करोनानंतर प्रत्येकवेळी त्रयस्थ देशांचे पंच सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये स्थानिक पंचांना हे काम देण्यात येऊ शकते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times