नवी दिल्ली: क्रिकेट २०२० स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने असा दावा केला आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आम्ही या स्पर्धेचे आयोजन करावा यासाठी सहमती दर्शवली आहे. करोना व्हायरसमुळे पाकिस्तानने आशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्यात असमर्थता दर्शवली आहे.

वाचा-
आशिया क्रिकेट संघटनेच्या बोर्डाची सोमवारी व्हिडिओ कॉन्फसद्वारे बैठक झाली. या बैठकीत आशिया कप स्पर्धेचे यजमानपदाबाबत चर्चा झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याआधीच स्पष्ट केले आहे की पाकमध्ये क्रिकेट खेळणे शक्य नाही. तर श्रीलंका क्रिकेटचे प्रमुख शम्मी सिल्वा यांनी असा दावा केला आहे की, पाक बोर्डाची श्रीलंकेत स्पर्धा भरवण्यात काहीच अडचण नाही.

स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत आम्ही पाकिस्तान बोर्डाशी चर्चा केली आहे. सध्याच्या परिस्थिती आम्ही याचे आयोजन करू शकतो. यासाठी PCBने हिरवा कंदील दिल्याचे, सिल्वा म्हणाले.

वाचा-
या बैठकीत बीसीसीआयकडून अध्यक्ष सौरव गांगुली आमि सचिव जय शहा हे उपस्थित होते. पाकिस्तानमध्ये या वर्षी नियोजित असलेल्या आशिया कप संदर्भात चर्चा झाली. पण अंतिम निर्णय झालेला नाही. बैठकीत आयसीसीच्या स्पर्धांबाबत देखील चर्चा झाली. स्पर्धेचे आयोजन कुठे करावे याबाबतचा निर्णय येणाऱ्या काळात घेतला जाईल.

करोना व्हायरसची स्थिती लक्षात घेता यावर्षी सप्टेंबर महिन्यात आशिया कप होईल असे वाटत नाही. फक्त आशिया कपच नाही तर यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचे सावट आहे. यंदा टी-२० वर्ल्ड कप असल्यामुळे यावर्षी आशिया कप स्पर्धेचे स्वरुप टी-२० ठेवण्यात आले होते.

वाचा-
बीसीसीआयने सुरुवातीपासूनच पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठिंबा दिला जात असल्याने भारताने क्रिकेट सामने खेळण्यास नकार दिला आहे. यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या आयोजित स्पर्धेत एकमेकांच्या विरुद्ध खेळतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here