नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस (१० जून) खास असा आहे. याच दिवशी १९८६ साली भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ विकेटनी पराभव केला होता.

वाचा

यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. या सामन्याआधी भारताने लॉर्ड्सवर १० कसोटी सामने खेळले होते. पण त्यात कधी विजय मिळवता आला नव्हता. १९८६ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने विजय मिळवला. इंग्लंडने पहिल्या डावात २९४ धावा केल्या. उत्तरादाखल भारताने ३४१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १८० धावात आटोपला.

वाचा-
भारतीय संघाकडे सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. भारताने ही संधी सोडली नाही. दुसऱ्या डावात ५ विकेटच्या बदल्यात १३६ धावा करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताने ७८ धावांवर चार आणि ११० धावसंख्येवर ५ विकेट गमवल्या होत्या. त्यानंतर कर्णधार कपील देव यांनी १० चेंडूत २३ धावा करत विजय मिळवून दिला. कपिल यांनी षटकार मारून विजय संघाला विजय मिळवून दिला होता.

इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावात संपुष्ठात आणण्यात कपिल देव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी दुसऱ्या डावात ४ विकेट घेतल्या होत्या. तर पहिल्या डावात यांनी नाबाद १२६ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे या शतकासह वेंगसरकर यांनी लॉर्ड्स मैदानावर सलग ३ कसोटी सामन्यात शतक करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला होता. त्यांनी १९७९ मध्ये १०३, १९८२ मध्ये १५७ आणि १९८६ मध्ये नाबाद १२६ धावा केल्या होत्या.

वाचा-
भारताने लॉर्ड्स मैदानावर ११व्या सामन्यात पहिला विजय मिळवला. भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटचा प्रवास याच मैदानावरून झाला होता. १९३२ साली भारताने पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हा भारताचा १५८ धावांनी पराभव झाला. भारताने पहिले ६ कसोटी सामने गमावले. १९६७ सालापर्यंत भारताचा पराभव झाला. १९७१ साली मालिकेत प्रथम सामना ड्रॉ झाला. ७४ साली पराभव, ७९ साली पुन्हा ड्रॉ आणि ८२ मध्ये मधील पराभवानंतर ८६ साली विजय मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here