या देशातील करोना बाधितांची संख्या सध्याच्या घडीला आटोक्यात आहे. सध्या तरी करोनाचा जास्त प्रसार या देशात झालेला नाही. त्यामुळेच बीसीसीआयने या देशाडबरोबर क्रिकेट खेळायला परवानगी दिली आहे. पण हे सामने खेळवताना सुरक्षिततेचे उपाय मात्र या देशाला घ्यावे लागणार आहे. या देशात खेळाडूंसाठी कोणते सुरक्षेचे उपाय घेतले जाणार, याची बीसीसीआय पाहणी करेल आणि त्यानंतर आपल्या खेळाडूंना क्रिकेट खेळवण्यासाठी पाठवणार आहे.
बीसीसीआयने या देशाला क्रिकेट मालिका खेळवण्यासाठी हिरवा कंदीलदिला असला तरी त्यांना अजून भारत सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआयला ही मालिका खेळता येणार नाही. त्यामुळे काही दिवसांतच बीसीसीआय भारत सरकारकडून या दौऱ्यासाठी परवानगी मागणार आहे.
भारत कोणाबरोबर खेळणार क्रिकेट मालिका…भारतीय संघ श्रीलंकेमध्ये जाऊन तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळात चर्चा झाली आहे. या दोन्ही मालिका जून महिन्यात खेळवण्यात येणार होत्या. पण आता सरकारच्या परवानगीनंतर या दोन्ही मालिका कधी खेळवायच्या, या गोष्टीचा विचार दोन्ही क्रिकेट मंडळांना करावा लागणार आहे.
आशिया क्रिकेट संघटनेच्या बोर्डाची सोमवारी व्हिडिओ कॉन्फसद्वारे बैठक झाली. या बैठकीत आशिया कप स्पर्धेचे यजमानपदाबाबत चर्चा झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याआधीच स्पष्ट केले आहे की पाकमध्ये क्रिकेट खेळणे शक्य नाही. तर श्रीलंका क्रिकेटचे प्रमुख शम्मी सिल्वा यांनी असा दावा केला आहे की, पाक बोर्डाची श्रीलंकेत स्पर्धा भरवण्यात काहीच अडचण नाही.
स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत आम्ही पाकिस्तान बोर्डाशी चर्चा केली आहे. सध्याच्या परिस्थिती आम्ही याचे आयोजन करू शकतो. यासाठी PCBने हिरवा कंदील दिल्याचे, सिल्वा म्हणाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times