सॅमीने आपल्याबरोबर कसा झाला आणि आपल्याला कसे हिणवले गेले, याबाबतची गोष्ट सांगितली आहे. सॅमी फक्त एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्याने या सर्व खेळाडूंचे मोबाईल क्रमांक मिळवले आहेत आणि त्यांना एक मेसेज पाठवला आहे. त्याचबरोबर मला जर तुम्ही माझ्या प्रश्चनाचे उत्तर दिले नाहीत तर तुमचे नाव मी सर्वांना सांगेन, अशी धमकीही त्याने दिली होती. आता तर सॅमीने आपल्याला डिवचणाऱ्या प्रत्येक खेळाडूला धारेवर धरले आहे. ज्या खेळाडूने आपल्याला त्यावेळी हिणवले होते. सॅमीने एक व्हिडीओ बनवला आहे.
गेलने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून गेलने सॅमीला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. गेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” योग्य कारणासाठी जर लढा द्यायचा असेल तर त्यासाठी उशिर करून चालणार नाही. आपल्या हक्कांसाठी कधीही लढा सुरु केला जाऊ शकतो.”
गेल पुढे म्हणाला की, ” सॅमीला यापूर्वी वर्णद्वेषाचा अनुभव आला असेल. त्यामुळेच तो याबाबत आपले मत मांडत आहे. सॅमीने ही गोष्ट सांगायला उशिर केला असे मला अजिबात वाटत नाही. ”
वेस्ट इंडिजचा अष्ट़पैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होनेही वर्णद्वेषाविरोधात आवा उठवला आहे. ब्राव्हो म्हणाला की, ” वर्णद्वेषाचे शिकार यापूर्वी बरेच जण झाले आहेत. याबाबत आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, आम्हाला फक्त बरोबरीचा अधिकार हवा आहे. आम्हालाही सन्मान मिळायला हवा. आतापर्यंत आम्ही सर्व सहन केले, यापुढेही आम्ही सहन करत राहायचे का? आता ही गोष्ट थांबायला हवी.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times