करोना व्हायरसमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करायचा का, याबाबत आज आयसीसीची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा की नाही याबाबत चर्चा करण्यात आली असून निर्णयही घेण्यात आला आहे.

आयसीसीच्या आजच्या बैठकीमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द केला जाईल, असे म्हटले जात होते. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयावर बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे लक्ष होते. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द झाल्यावरच बीसीसीआयला आयपीएल खेळवता येणार आहे. पण जर ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवला गेला तर या वर्षी तरी आयपीएल होणार नाही, असे दिसत आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द झाल्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत होती. आयपीएल नेमकी कुठे खेळवायची याबाबतही बीसीसीआय विचार करत होती. करोना व्हायरसमुळे आयपीएल जर भारतामध्ये खेळवण्यात येणार नसेल तर त्यासाठी पर्यायही शोधले गेले होते. आयपीएल भरवण्यासाठी श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांनी बीसीसीआयपुढे प्रस्ताव ठेवला आहे.

आयपीएल होणार की नाही, हे सारे ट्वेन्टी-२० विश्वचषकावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक भरवण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यावेळी ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द होणार असे बऱ्याच जणांना वाटले होते. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार होता.

आयसीसीच्या आजच्या बैठकीत का झाले…आयसीसीच्या आजच्या बैठकीत करोना व्हायरसबाबत चर्चा करण्यात आली. सध्याच्या घडीला परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज घेण्यात आला. त्याचबरोबर भविष्यात ही स्पर्धा खेळवायची की नाही, याबाबत चर्चाही करण्यात आली. पण ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा की रद्द करायचा, याबाबत अजूनही आयसीसीने निर्णय घेतलेला नाही. अजून एक महिनाभर तरी ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय घेण्यासाठी आयसीसी वाट पाहणार असल्याचे समजते.

कारण आयसीसीने आज आपली बैठक झाल्यावर एक ट्विट केले आहे. त्यानुसार ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय आता पुढच्या महिन्यात होऊ शकतो, असे म्हटले आहे. आयसीसीच्या बैठकीमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द होण्याचा निर्णय होईल आणि त्यानंतर आपण आयपीएलच्या तयारीसाठी लागू शकतो, असे बीसीसीआयला वाटत होते, पण तसे घडलेले मात्र दिसत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here