आयपीएल या वर्षी होणारच, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगिले आहे. त्यानंतर आयपीलमधील एका संघाने सराव करायचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी सराव करायला सुरुवातही केली आहे. करोनानंतर सराव करणारा हा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे.

या वर्षी स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आयोजित करावी लागणार आहे. यासाठी गरज पडली तर प्रेक्षकांशिवाय मोकळ्या मैदानात घेण्याची तयारी करावी लागेल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच एका संघाने आता सराव करण्याचे आता निश्चित केले.

आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद पटकावली आहे ती मुंबई इंडियन्सने. त्यामुळे या वर्षीही मुंबईचा संघ जेतेपद पटकावण्यासाठी आतूर आहेत. त्यामुळेच मुंबईच्या संघाने आता सराव करायला सुरुवात केली आहे. आयपीएलमधील मुंबई संघ हा पहिला असेल जो करोनानंनतर सराव करायला मैदानात उतरला आहे. नवी मुंबईतील घणसोली येथे रिलायन्सने एक स्टेडियम बांधले आहे. या स्टेडियममध्ये मुंबईच्या संघाने सराव करायला सुरुवात केली आहे.

मुंबई इंडियन्सने सराव करण्यासाठी काही खेळाडूंना आमंत्रित केले आहे. या खेळाडूंमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, यष्टीरक्षक आदित्य तरे, सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांचा समावेश आहे. तपण हा सराव अनिवार्य नसल्याचे मुंबईच्या संघाने स्पष्ट केले आहे.

याबाबत सूर्यकुमार यादवने सांगितले की, ” मुंबईच्या संघाने आम्हाला सराव करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मी हातामध्ये बॅट पकडण्यासाी उत्सुक आहे. या सरावामध्ये सर्व सुरक्षेचे नियम पाळले जातील. त्याचबरोबर फिटनेस आणि फलंदाजी या गोष्टींवर मी आता भर देणार आहे. यावेळी आमच्यासाठी खास गोलंदाजीची मशिनही आणण्यात आली आहे. या मशिनबरोबर आम्ही फलंदाजीचा सराव करणार आहोत. हा मोसमही आमच्या संघासाठी फार महत्वाचा आहे, त्यामुळे लवकरच सराव करायला संघाने सुरुवात केली आहे. या गोष्टीचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here