वाचा-
मायकल वॉनने पडलेल्या खेळाडूंचा कसोटी संघ निवडला आहे. या संघात त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केला असून पण त्यात एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिले नाही. वॉनने तयार केलेल्या या संघात एकही भारतीय न दिसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर सलामीवीर म्हणून या संघात स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागला जागा मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला का स्थान दिले नाही असा सवाल केलाय.
वाचा-
या संघात वॉनने सलामीवीर इंग्लंडचे माजी प्रशिक्षक ग्राहम गूच आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हर्शल गिब्स यांना स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्याच हाशिम अमला याला स्थान दिले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि प्रशिक्षक डॅरेन लेहमन आणि जोनाथन ट्रॉट यांचा समावेश केलाय.
टक्कल पडलेल्या खेळाडूंच्या या संघाचे कर्णधार पद ब्रायन क्लोज यांच्याकडे देण्यात आले आहे. तर विकेटकीपर म्हणून मॅट प्रायर याची निवड केली.
वाचा-
गोलंदाज म्हणून डग बोलिंगर, राणा नावेद उल हसन, नाथन लियोन आणि जॅक लीच/ ख्रिस मार्टिन यांचा समावेश आहे. एकूण या संघाकडे पाहिले तर वॉनने हुशारी दाखवली आहे.
असा आहे मायकल वॉनचा टक्कल पडलेल्या खेळाडूंचा संघ– ग्राहम गूच, हर्शल गिब्स, हाशिम अमला, डॅरेन लेहमन, जोनाथन ट्रॉट, ब्रायन क्लोज (कर्णधार), मॅट प्रायर (विकेटकीपर), राणा नावेद उल हसन, नाथन लियोन, जॅक लीच/ख्रिस मार्टिन
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times