दुबई: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेट मॅचला थोड्याच वेळात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. याआधी दोन्ही संघात गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये मॅच झाली होती. तेव्हा पाकने भारताचा १० विकेटनी पराभव केला होता. आता टीम इंडियाला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. या सामन्याचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…

भारत विरुद्ध पाकिस्तान Live अपडेट (IND vs PAK Asia Cup 2022 Live Updates)

>> असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आवेश खान

>> टॉस-
आशिया कप २०२२: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>> दोन्ही संघाचे चाहते

>> भारत विरुद्ध पाकिस्तान, सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

>> टी-२०मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान
एकूण लढती-०९
भारताचा विजय- ०७
पाकिस्तानचा विजय- ०२

>> वाचा-आशिया कपमध्ये भारताविरुद्ध जिंकण्याचा पाकने विचार देखील करू नये; आकडेवारीच सर्व काही बोलते

भारताचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार

पिच आणि हवामान-
दुबईचे मैदान हे मोठे आहे. या मैदानावर फलंदाजी करणे सोपे नाही. सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळते. त्याच बरोबर फिरकीपटूंना देखील मधळ्या षटकात फायदा होतो. यामुळेच १५०च्या पुढील धावसंख्या आव्हानात्मक ठरले. तापमान ३९ डिग्री असेल. पावसाची कोणतीही शक्यता नाही. दुसऱ्या डावात दवाचा प्रभाव दिसू शकेल.

>>रोहित शर्मा आज पाकिस्तानविरुद्ध हिशेब चुकता करणार

>> भारत आणि पाकिस्तान लढतीला थोड्याच सुरुवात होणार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here