लॉकडाऊनमध्ये जास्त लोकं रस्त्यावर नसतात. प्रत्येक जण आपल्या घरामध्येच काही ना काही काम करत असतो. ही गोष्ट चोरांसाठी फावल्याचे पाहायला मिळत आहे. जास्त लोकं नसल्यामुळे चोरी करण्याचे प्रकार आता वाढत चालले आहेत.
या क्रिकेटपटूने सांगितले की, ” लॉकडाऊनच्या तिसऱ्या चरणामध्ये माझ्या घरी तीनवेळा चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोरांनी माझ्या
मित्राची गाडी फोडून काही गोष्टी लंपासही केल्या आहेत. काल रात्री माझ्या घरी पुन्हा एकदा चोर घुसले होते. या चोरांनी माझ्या आईला घाबरवण्याचा प्रयत्न केला. सध्या माझ्या घरात आई एकटीच राहत आहे. या सर्व प्रकारामुळे ती घाबरली आहे.”
लॉकडाऊनच्या काळात चोरांनी बऱ्याच जणांचे नुकसान केल्याच्या घटनाही पुढे येत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्या फोडून चोरी करण्याचे प्रकार आता वाढत चालले आहे.
कोणत्या क्रिकेटपटूच्या घरी झाली तीनवेळा चोरीलॉकडाऊनच्या काळात तब्बल तीन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या घरात झाला आहे. ही माहिती स्टेनने एक ट्विट करत दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वांनी सुरक्षित राहायला हवे, असे आवाहनही त्याने केले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times