करोनानंतर जेव्हा क्रिकेट सुरु होईल तर ते अधिक रंजक असावे, असे काही जणांना वाटत आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० लीगमध्ये काही बदल करण्यात येणार आहे. हे बदल करण्यात आल्यावर ट्वेन्टी-२० लीगमध्ये धावांचा पाऊस पडेल आणि क्रिकेट अधिक मनोरंजक होईल, असे म्हटले जात आहे. कारण या नवीन नियमांमुळे खेळातील रंजकता अजून वाढायला मदत होईल. त्याचबरोबर चाहत्यांनाही हे नवीन नियम आकृष्ठ करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे करोनानंतर क्रिकेट सुरु झाल्यावर चाहत्यांना जास्त आनंद मिळू शकेल.
नवीन नियम कोणते…ट्वेन्टी-२० लीगमध्ये आता दोन पॉवर प्ले ठेवण्याच्या नियमावर विचार सुरु आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला एकच पॉवर प्ले दिला जातो. पण आता दोन षटकांचा अतिरीक्त पॉवर प्ले देण्याबाबत विचार सुरु आहे. हा पॉवर प्ले कधीही घेता येऊ शकतो, असा ठेवण्यात येणार आहे.
वाचा-
ट्वेन्टी-२० लीगमध्ये फ्री हीटचा नियमही आता बदलला जाऊ शकतो. यापूर्वी नो बॉल पडला की फलंदाजी करणाऱ्या संघाला फ्री हिट मिळायचा. पण आता तर वाइड चेंडूवरही फ्री हिट देण्याचा विचार सुरु झाला आहे.
पहिल्या १० षटकांनंतर ज्या संघाच्या जास्त धावा आहेत त्यांना बोनस गुणही दिला होऊ शकतो. त्याचबरोबर १० षटकांनंतर एक बदली खेळाडू खेळवला जाऊ शकतो.
वाचा-
कुठे पाहायला मिळतील बदलसध्याच्या घडीला जगभरात ट्वेन्टी-२० लीग सुरु आहेत. पण यामध्ये आयपीएल आणि बिग बॅश लीग चांगलीच प्रसिद्ध आहे. बिग बॅश लीगमध्ये काही बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार वरील बदल बिग बॅश लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times