वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी भारतीय खेळाडूंना धमकी देत असल्याचे पुढे आले आहे. पण तो या सर्व गोष्टी का करतो, याचे कारणही आता पुढे आले आहे. सॅमीला पाकिस्तानमध्ये राजासारखी वागणूक मिळत असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

सॅमी सध्या पाकिस्तान सुपर लीगचा एक भाग आहे. सॅमीकडे सुपर लीगमधील पेशावर या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्वही देण्यात आले आहे. मार्च महिन्यात सॅमीला पाकिस्तानचे मानद नागरिकत्व देण्यात आले आहे. सॅमीला पाकिस्तानमधील मानाचा समजला जाणारा नागरी पुरस्कारही देण्यात आला आहे. त्यामुळे आता सॅमी पाकिस्तानचे गोडवे गायला लागला असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे खेळाडू भारतीय क्रिकेटपटूंबाबत गरळ ओकत असतात, हीच सवय आता सॅमीलाही लागल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व मिळाल्यावरच सॅमीने भारतीय खेळाडूंना धमी दिल्याचे पाहायला मिळत आहे.

“सॅमीला पाकिस्तानमध्ये एखाद्या राजासारखी आम्ही वागणूक देतो. वेस्ट इंडिजच्या सर्वच खेळाडूंचा पाकिस्तानमध्ये वेगळाच थाट असतो. कारण पाकिस्तानची जनता वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर प्रेम करते. वेस्ट इंडिजचे खेळाडू हे एकहाती सामना फिरवू शकतात. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानमधील लोकं पसंत करत आहेत,” असे पेशावरच्या संघ मालक जावेद आफ्रिदी यांनी सांगितले आहे.

सॅमीने काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील खेळाडूंना चक्क धमकी दिली होती. माझ्याबरोबर ज्यांनी वर्णद्वेष केला त्यांना मी मेसेज पाठवत आहे. जर या खेळाडूंनी मला उत्तर दिले नाही, तर जगासमोर या खेळाडूंचे नाव जाहीर करेन, अशी धमी सॅमीने दिली होती. आयपीएल ही प्रत्येक खेळाडूला प्रिय आहे. कारण आयपीएलमध्ये खेळण्याबरोबरच चांगला पैसाही मिळतो. पण आयपीएलमधून आता आपल्याला कोणताही लाभ होऊ शकत नाही, हे सॅमीला बहुतेक समजले असावे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये त्याला चांगला पाहुणचार मिळत आहे. त्यामुळे आता सॅमीला पाकिस्तान भारतापेक्षा आवडू लागले आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे सॅमी या परिस्थितीतही भारतीय खेळाडूंना त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here