वाचा-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत जे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. यापैकी कोणता खेळाडू द्विशतक करू शकेल याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणाला, टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार हाच टी-२० मध्ये द्विशतक करू शकतो. हॅलो अॅपवरील लाइव्ह चॅटमध्ये १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्ग सोबत तो बोलत होता.
वाचा-
गर्गने कैफला टी-२०त कोणता फलंदाज द्विशतक करू शकतो असा प्रश्न विचारला, त्यावर रोहित हे काम करू शकतो. टी-२० रोहितने शतक केल्यास त्याचा स्ट्रइक रेट २५० ते ३०० इतका होईल. त्यामुळे रोहित २००चा टप्पा गाठू शकेल, असे कैफ म्हणाला.
वनडे क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतकी खेळी करणारा रोहित शर्मा हा एकमेव क्रिकेटपटू आहे. रोहितने वनडे आणि कसोटीमध्ये द्विशतक केले आहे. तर टी-२० मध्ये ४ शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
वाचा-
टी-२०त रोहित शर्माच द्विशतक करू शकतो असे मत फक्त कैफने नाही तर ऑस्ट्रेलयाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॅग याने देखील याआधी व्यक्त केले होते.
कैफचा प्रियमला सल्ला
लाइव्ह चॅटमध्ये कैफने प्रियमला सल्ला देखील दिला की, फक्त आयपीएल टी-२० लीग खेळणे हे लक्ष्य असता कामा नये. आयपीएल ही कधीच पहिली निवड असू नये. युवा क्रिकेटपटूंनी रणजी सामन्यांवर लक्ष्य दिले पाहिजे. चार दिवसांच्या रणजी सामन्यात खेळाडूला वेगवेगळ्या पद्धतीच्या पिचवर खेळण्याची संधी मिळते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times