अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची कमतरता भासू लागल्यावर सामान्य लोकांना या कामासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी काही लोकं या समाज कार्यासाठी पुढे आल्या होत्या. यामधील एका भारतीय नर्सचे गिलख्रिस्टने कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा शब्दांत गिलख्रिस्टने भारतीय नर्सचे स्वागत केले आहे.
भारतीय नर्स वोलोंगगोंग येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. तिची काम करण्याची आणि करोना बाधितांना सांभाळण्याची पद्धत पाहून गिलख्रिस्ट भारावून गेला आहे. आपल्या कुटुंबांतील व्यक्तीसारखी ही भारतीय नर्स करोना बाधितांची काळजी घेत असल्याचे गिलख्रिस्टने पाहिले आणि तो भावूक झाला.
या भारतीय वंशाच्या नर्सचे नाव आहे शॅरोन वर्गीस. शॅरोन ही वोलोंगगोंगच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर सध्याच्या घडीला देशसेवा ही करताना दिसत आहे. करोना बाधित व्यक्तींना ही भारतीय नर्स आधार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या करोनाच्या काळात नातेवाईकही आपल्या लोकांची जेवढी काळजी घेत नाहीत, तेवढी काळजी शेरॉन घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच शेरोनचे अभिनंदन करणयासाठी गिलख्रिस्ट पुढे आला आहे. आपल्याला तुझा अभिमान वाटतो, असे गिलख्रिस्टने शॅरोनला सांगितले आहे.
या भारतीय नर्सबाबत गिलख्रिस्ट म्हणाला की, ” शॅरोन, तु जे कार्य हाती घेतले आहेस, त्याचे मी प्रथम अभिनंदन करतो. ऑस्ट्रेलिया आणि भारतच नाही तर तुझ्या कुटुंबियांनाही तुझा गर्व आहे. तु तुझे कार्य असेल चालू ठेव. करोनाविरोधात आपण सर्वांनी एकजूटीने लढूया…”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times