भारतामध्ये करोनाचे संकट घोंघावत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील अलिबागला काही दिवसांपूर्वी चक्रीवादळाने तडाखा दिला होता. ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही अम्फान या चक्रीवादळाने भरपूर नुकसान केले आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे हाल सुरु होते. पण त्यांच्या मदतीला आता भारताचा एक दिग्गज क्रिकेटपटू धावून आला आहे. या परिस्थितीत तब्बल १० हजार कुटुंबियांना त्याने मदत केल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला भारतामध्ये काही ना काही संकटं येत आहेत. या परिस्थितीमध्ये सामान्य माणसांची बिकट अवस्था होत आहे. सरकार त्यांच्यासाठी मदत करत असली तरी ती काहीवेळा अपुरी पडत असते. त्यामुळे समाजातील काही सेलिब्रेटी लोकांच्या मदतीला धावून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या या महान क्रिकेटपटूने या काळात फार मोठे काम केले आहे.

ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही अम्फान या चक्रीवादळाने थैमान घातले होते. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्व सामान्य माणसं हताश झाली होती. या लोकांना मदत करण्यासाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेले सौरव गांगुली धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. गांगुली यांनी तब्बल १० हजार कुटुंबियांना यावेळी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे.

सौरव गांगुली फाऊंडेशनच्या माध्यमातून दादाने लोकांची मदत केली आहे. यावेळी त्याने एमआई इंडिया या संस्थेबरोबर हे समाजकार्य केले आहे. ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही अम्फान या चक्रीवादळामध्ये बऱ्याच जणांच्या घरांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर त्यांच्यावर जवळपास उपासमारीची वेळ आली होती. कारण या चक्रीवादळात काही संसार उघड्यावर आले होते. त्यांच्या मदतीसाठी आता गांगुलीने मदतीचा हात पुढे केला आहे.

गांगुलीने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये गांगुली म्हणाला की, ” काही इंनिग्ज तुमची कठीण परीक्षा घेत असतात. काही परिस्थितींमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागते. बंगालमध्ये भयंकर चक्रीवादळ आले होते, ज्यामुळे बरेच नुकसान झाले. या गोष्टीने आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here