Authored by prasad lad | Maharashtra TimesUpdated: Aug 30, 2022, 5:42 PM

Asia cup 2022 : भारताचा आता पुढचा सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होऊ शकतात. कारण गेल्या सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंना चांगली छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघातून या तीन खेळाडूंना बाहेर केले जाऊ शकते. पण संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, पाहा….

 

asia cup 2022
सौजन्य-बीसीसीआय ट्विटर
दुबई : आशिया चषकातील भारताचा पुढचा सामना हा हाँगकाँगबरोबर होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी हा सामना जिंकत त्यांना पुढच्या फेरीत जाता येणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होणार असल्याचे समोर येत आहे.
पहिला बदल…
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण त्यामध्ये अवेश खान हा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. अवेशने २ षटकांत १९ धावा दिल्या आणि त्यामुळेच त्यानंतर त्याला गोलंदाजी दिली नाही. त्यामुळे या सामन्यासाठी अवेश खानला संघाबाहेर केले जाऊ शकते. अवेशच्या जागी यावेळी भारतीय संघात दीपक चहरला संधी मिळू शकते. कारण चहर हा वेगवान गोलंदाजी तर करतोच, पण त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे या सामन्यात हा पहिला बदल पाहायला मिळेल.

दुसरा बदल…
भारतीय संघात यावेळी दुसरा बदल हा फिरकी गोलंदाजीमध्ये होऊ शकतो. कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. चहलला यावेळी चार षटके टाकण्यासाठी दिली होती, पण या चार षटकांमध्ये त्याेन ३२ धावा दिल्या आणि एकही विकेट त्याला मिळवता आली नाही. त्यामुळे या सामन्यासाठी त्याला संघाबाहेर केले जाऊ शकते. चहलच्या जागी संघात स्थान देण्यासाठी दोन पर्याय भारतीय संघापुढे आहेत. भारतीय संघ यावेळी अनुभवाच्या जोरावर आर. अश्विनला संघात स्थान देऊ शकते. कारण त्याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. भारताकडे दुसरा पर्याय हा दीपक हुडाचा असेल. दीपकने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे आणि तो भारतासाठी लकी मॅचविनरही ठरला आहे. त्यामुळे या स्थानासाठी दीपकच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

तिसरा बदल…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला संधी न दिल्यामुळे काही जणांनी भारतीय संघावर टीका केली होती. पण दुसऱ्या सामन्यात आता त्याला संधी दिली जाऊ शकते. कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला आपली छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यासाठी दिनेशच्या जागी पंतच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. पण फक्त एका सामन्याच्या आधारावर दिनेशला संघाबाहेर काढायचे का, हा विचार भारतीय संघाला यावेळी करावा लागेल. कारण दिनेशकडे चांगला अनुभव आहे आणि तो सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मातही आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here