नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पदार्पण हे कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. कसोटी क्रिकेटमधील यशावर फलंदाजाचे मुल्यमापन केले जाते. एखाद्या खेळाडूने जर पदार्पणातच शतकी खेळी केली तर ती शानदार सुरूवात मानली जाते. पण जर केले तर…

वाचा-
पहिला कसोटी सामना १८७७ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. तेव्हापासून आतापर्यंत १४३ वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त पाच फलंदाज असे झाले आहेत ज्यांनी पदार्पणातच द्विशतक करण्याची कमाल केली. जाणून घेऊयात पदार्पणातच द्विशतक करणाऱ्या दिग्गजांबद्दल.

रेजिनाल्ड फोस्टर- इंग्लंडचे फलंदाज रेजिनाल्ड हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले असे फलंदाज आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक केले. १९०३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी त्यांनी पदार्पण केले होते. या सामन्यात रेजिनाल्ड यांनी २८७ धावांची खेळी केली. यात ३७ चौकारांचा समावेश होता. क्रिकेट जगतात रेजिनाल्ड यांची ओळख टिम फोस्टर या नावाने होते. ते इंग्लंडचे असे एकमेव पुरुष खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट आणि फुटबॉल संघाचे नेतृत्व केले. रेजिनाल्ड यांनी ८ कसोटी सामन्यात ६०२ धावा केल्या. अर्थात त्यांचे पहिले द्विशतक हे अखेरचे ठरले.

वाचा-

लॉरेंस रोवे- वेस्ट इंडिजचे रोवे यांनी १९७२ साली पदार्पण केले आणि पहिल्या सामन्यात द्विशतक केले. कसोटी क्रिकेटमध्ये ६९ वर्षानंतर एका फलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक करण्याची कामगिरी केली होती. रोवे यांनी १९७२ साली किंग्स्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध २१४ धावांची खेळी केली. इतक नव्हे तर त्यांनी दुसऱ्या डावात देखील शतकी खेळी केली. रोवे यांनी ३० सामन्यात ७ शतक केली.

ब्रेंडन केरुप्पू- श्रीलंकेच्या ब्रेंडन केरुप्पू यांनी १९८७ साली न्यूझीलंडविरुद्ध कोलंबो कसोटी पदार्पण केले आणि नाबाद २०१ धावा केल्या. केरुप्पू यांनी फक्त ४ कसोटी सामने खेळले. त्यांनी कसोटीच्या तुलनेत वनडे सामने अधिक खेळले. वनडेतील ५४ सामन्यात त्यांनी १ हजार २२ धावा केल्या यात ४ अर्धशतकांचा समावेश होता.

वाचा-

मॅथ्यू सिंक्लेर- दक्षिण आफ्रिकेचे मॅथ्यू सिंक्लेर हे देखील कसोटी पदार्पणात द्विशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत. १९९९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत त्यांनी २१४ धावा केल्या. त्यांनी ४४७ चेंडूत २२ चौकारांसह द्विशतक केले. सिंक्लेर यांनी करिअरमध्ये ३२ सामन्यात २ शतक केले.

जेक्स रुडोल्फ– दक्षिण आफ्रिकेच्या जेक्स रूडोल्फ यांनी २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध पदार्पणाच्या केले. अशी कामगिरी करणारे ते पाचवे फलंदाज आहेत. त्यांनी बांगलादेशविरुद्ध नाबाद २२ धावा केल्या. रूडोल्फ यांनी केलेल्या द्विशतकानंतर कसोटीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here