वाचा-
जवळपास दोन महिन्यानंतर चीनची राजधानी बीजिंगमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली. यामुळे प्रशासनाने बीजिंगमधील काही भागांमध्ये लॉकडाउन केला आहे. वुहाननंतर चीनमध्ये करोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा सुरू झाली.
काही दिवसांपूर्वी करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चीनमध्ये विविध खेळाचे सराव सुरू झाले होते. पण आता करोनाचे रुग्ण आढळल्याने क्रीडा स्पर्धा पुन्हा स्थगित केल्या गेल्या आहेत. यासंदर्भात चीन शहरातील प्रशासकीय केंद्राने एक नोटीस जाहीर केली.
वाचा-
या नोटीशीनुसार शहरातील क्रीडा स्पर्धाचे आयोजन तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. सिन्हुआच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी बीजिंगमध्ये करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले होते. शहरात रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व प्रकारचे क्रीडा कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत, असे म्हटले आहे.
वाचा-
करोना व्हायरसमुळे यावर्षी जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि अन्य सर्व क्रीडा स्पर्धा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ज्या देशात करोनाचे रुग्ण कमी झालेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे अशा देशात प्रेक्षकांशिवाय स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत.
वाचा-
गुरुवारी, राजधानी बीजिंगमध्ये ५६ दिवसांनंतर करोनाबाधित रुग्ण आढळल्याची नोंद झाली होती. शहरातील शिचेंग भागात करोनाबाधित रुग्ण आढळला असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. सध्या परदेशांतून येणारे, तसेच इतर शहरांतून बीजिंगमध्ये येणाऱ्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्याचे धोरण चिनी अधिकाऱ्यांनी अवलंबिले आहे. राजधानीतील रुग्ण संपल्यामुळे येथे सुरक्षित वावराचे नियम शिथिल करण्यात आले होते. मास्क न वापरण्याचीही सवलत देण्यात आली होती. मात्र, बीजिंगमध्ये पु्न्हा एकदा काही भागांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नवीन आढळलेले काही रुग्णांचा दक्षिण बीजिंग भागातील एका मांस विक्री बाजाराशीही संबंध आला असल्याची चर्चा आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times