क्रिकेट जगतात १३ जून या तारखेला खास असे स्थान आहे. विशेषत: महिला क्रिकेटसाठी ही तारीख सन्मानाने आणि गर्वाने घेतली जाते. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करण्याची कामगिरी काही मोजक्या क्रिकेटपटूंनी केली आहे. आजच्या दिवशी २०१८ साली न्यूझीलंडच्या एमेलिया केर हिने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी वनडेत नाबाद २३२ धावांची खेळी केली होती. केरने आयर्लंडविरुद्ध द्विशतक करून इतिहास घडवला होता. वनडे क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला) सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम केरच्या नावावर आहे. तर महिला क्रिकेटमध्ये बेलिंडा क्लार्कनंतर द्विशतक करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये इतक्या कमी वयात द्विशतक करण्याची कामगिरी कोणी करू शकले नाही. याबाबत केरने भारताच्या रोहित शर्माला देखील मागे टाकले.

महिला क्रिकेटमध्ये सर्वात पहिले द्विशतक ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेलिंडा क्लार्कने केले होते. आंतरराष्ट्रीय वनडेत पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये झालेले हे पहिले द्विशतक होते. क्लार्कने १६ डिसेंबर १९९७ रोजी डेनमार्कविरुद्ध १५५ चेंडूत नाबाद २२९ धावा केल्या होत्या. क्लार्कच्या या विक्रमी खेळीनंतर २१ वर्षांनी एमेलिया केरने नाबाद २३२ धावा करत नवा रेकॉर्ड केला. तसेच महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती दुसरी क्रिकेटपटू ठरली.

न्यूझीलंडची सलामीवीर असलेल्या एमेलिया केरने आयर्लंडविरुद्ध तुफानी फलंदाजी करत फक्त १४५ चेंडूत नाबाद २३२ धावा केल्या होत्या. या खेळीत ३१ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. केरचा स्ट्राइक रेट १६० इतका होता. केर आणि कास्परेक (११३)च्या धडाकेबाज खेळीमुळे न्यूझीलंडने ५० षटकात ३ विकेटच्या बदल्यात ४४० धावा केल्या. यासह न्यूझीलंडने सलग तिसऱ्या सामन्यात ४००हून अधिक धावा केल्या होत्या. वनडेतील सर्वाधिक धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे.

डबलिन येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करिअरमधील फक्त २०वी मॅच खेळणाऱ्या केरने सुरुवातीला धीमी फलंदाजी केली. ५० धावा करण्यासाठी तिने ४५ चेंडू घेतले. पण अर्थशतक झाल्यानंतर केरच्या फलंदाजीची स्टाइलच बदलली. तिने पुढील ५० धावा ३२ चेंडूत केल्या. ७७ चेंडूत शतकी खेळी, नंतर १०२ चेंडूत १५० धावा आणि १३४व्या चेंडूवर चौकार मारत २०० धावांचा टप्पा गाठला. या खेळीत तिला दोन वेळा जीवनदान मिळाले. केरचे हे वनडेतील पहिले शतक ठरले. त्याआधी नाबाद ८१ ही तिची सर्वोच्च खेळी होती.

महिला क्रिकेटमध्ये बेलिंडा क्लार्क आणि केर यांनी वनडेत द्विशतक करण्याची कामगिरी केली. तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ६ फलंदाजांनी अशी कामगिरी केली. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टिन गप्टिल, ख्रिस गेल आणि फखर जमा यांचा समावेश आहे. भारताच्या रोहित शर्माने सर्वाधिक ३ वेळा द्विशतक केले. वनडेतील सर्वोच्च धावसंख्या २६४ रोहितच्या नावावर असून त्याने १३ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.

या सामन्यात न्यूझीलंडने सलग तिसऱ्या सामन्यात ४०० धावा केल्या होत्या. त्याआधी ८ जून २०१८ रोजी न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ४९१ धावा केल्या. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही एखाद्या संघाने (महिला आणि पुरुष मिळून) केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे महिला क्रिकेटमध्ये ५० षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाच्या यादीत पहिले ४ विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहेत.> ४९१- विरुद्ध आयर्लंड,> ४५५- विरुद्ध पाकिस्तान,> ४४०- विरुद्ध आयर्लंड, > ४१८ विरुद्ध आयर्लंड

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here