मुंबई: प्रथम श्रेणी क्रिकेटमधील भारतातील सर्वात वयस्कर माजी खेळाडू यांचे शनिवारी राहत्या घरी निधन झाले. ते १०० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. रायजी यांच्या निधनावर मास्टर ब्लास्टर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने शोक व्यक्त केला.

वाचा-
रायजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना सचिन म्हणाला, मी या वर्षाच्या सुरुवातीला वसंत रायजी यांची त्यांच्या १००व्या वाढदिनी भेट घेतली होती. आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्यात क्रिकेट खेळण्याचा आणि पाहण्याचा एक उत्साह होता. रायजी यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या परिवार आणि मित्रांसोबत माझ्या संवेदना आहेत.

वाचा-

बीसीसीआयने देखील रायजी यांना श्रद्धांजली दिली. बोर्डने वेबसाइटवर लिहले आहे की, प्रथम श्रेणीतील माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचे इतिहासकार वसंत रायजी यांच्या निधनाच्या वृत्ताने बीसीसीआयला दु:ख झाले. रायजी यांनी या वर्षी २६ जानेवारी रोजी शंभरावा वाढदिवस साजरा केला होता.

वाचा-

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील घरी मध्यरात्री २.२० वाजता रायजी यांचे निधन झाल्याचे त्यांचा जावई सुदर्शन नानावटी यांनी सांगितले.

रायजी यांनी मुंबईकडून १९४०च्या दशकात ९ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी २७७ धावा केल्या. ६८ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. रायजी १३ वर्षांचे असताना भारताने मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्याचे ते साक्षीदार होते. त्यांनी मुंबई आणि वडोदरा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते क्रिकेट इतिहासकार आणि चार्टर्ट अकाउटंट होते. मुंबईतील जॉली क्रिकेट क्लबचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी रणजीत सिंहजी, दिलीप सिंहजी, विक्टर ट्रम्पर, सीके नायडू आणि एलपी जय यांच्यावर पुस्तक लिहले होते.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here