Asia cup 2022 : आजच्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताला रोहित शर्माने झंझावाती सुरुवात करून दिली खरी, पण त्याला २१ धावांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे लोकेश राहुलला ३६ धावा करण्यासाठी ३९ चेंडू खर्च करावे लागले. पण सूर्यकुमारने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली, तर दुसरीकडे कोहलीने दमदार खेळी साकारली आणि अर्धशतक साकारले.

कोहली शांतपणे फलंदाजी करत असला तरी सूर्याने मात्र धमाकेदार फटकेबाजी करत भारताचा रनरेट चांगलाच वाढवला. सूर्यकुमारने यावेळी आपल्या फटकेबाजीने सामन्यात चांगले रंग भरले. पण राहुलनंतर कोहलीही थोडी सावध फलंदाजी करत असल्यामुळे थोडा ट्रोल झाला. पण सूर्याने यावेळी चाहत्यांची मने जिंकली. चौथ्या स्थानावर येत सूर्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर संघाला गरज असताना त्याने धावसंख्येचा गिअर बदलल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने यावेळी ४०व्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. फेब्रुववारीनंतर कोहलीने हे पहिले अर्धशतक झळकावले होते. अर्धशतक झळकावल्यावर मात्र कोहली आक्रमकपणे फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. अर्धशतकानंतर कोहलीने षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. सूर्याने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजी करत सर्वांची मनं जिंकली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times