काही वेळा क्रिकेटच्या मैदानात एखादा फलंदाज चांगली कामगिरी करत असेल तर गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक त्याच्यावर शाब्दिक हल्ले चढवत असतात. जेणेकरून त्या फलंदाजाची एकाग्रता भंग व्हावी आणि त्याने एखादी चूक करून आपली विकेट गमवावी. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूंवर असे शाब्दिक हल्ले होत असतात. पण पंड्याने भारताच्याच खेळाडूवर स्लेजिंग केल्याचे पाहायला मिळत आहे.
हा खेळाडू आहे तरी कोण…भारताने ऑस्ट्रेलियामध्ये युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक जिंकला होता. युवा संघातून खेळताना शुभमन गिलचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. कारण शुभमनकडून नेत्रदीपक अशीच कामगिरी पाहायला मिळाली होती. शुभमनच्या कामगिरीवर स्तुतीसुमनांचा वर्षावही करण्यात आला होता. पण शुभमनविरोधात हार्दिकने स्लेजिंग केल्याचे आता बाहेर आले आहे. एका लाइव्ह चॅटमध्ये शुभमन काही जणांवर बरोबर चर्चा करत होता. यावेळी हार्दिकने माझ्याविरोधात स्लेजिंग केले होते, असा खुलासा शुभमनने केला आहे.
यावेळी शुभमन म्हणाला की, ” एकदा मी पंजाबच्या संघाकडून खेळत होतो. त्यावेळी आमचा सामना बडोद्याबरोबर होता. त्यावेळी बडोद्याच्या संघात हार्दिकही होता. त्यावेळी मी फलंदाजी करत होतो आणि हार्दिकची गोलंदाज सुरु होती. त्यावेळी हार्दिकच्या गोलंदाजीवर मी मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यावेळी मी एक फटका मारला होता, तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातमध्ये गेला होता. तेव्हा हार्दिकने स्लेजिंग करायला सुरुवात केली. हार्दिक मला म्हणाला की, चल फटके मार ना. हे काही १९ वर्षांखालील क्रिकेट नाहीए. चल फटके मारून दाखव.”
या सर्व प्रकारानंतर भारताच्या युवा खेळाडूंवर अशी टीका हार्दिकने करणे उचिच नसल्याचा सूर चाहत्यांकडून उमटत आहे. काही चाहत्यांनी या प्रकारानंतर हार्दिकला ट्रोलही केले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times